रसायनी शिवसत्ता टाइम्स (आनंद पवार):-
रसायनी पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक वसंत भाऊराव म्हामुनकर हे ३१ ऑक्टोबर रोजी ४० वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले…पोलीस उपनिरीक्षक वसंत म्हामुनकर यांचा सेवानिवृत्ती व निरोप समारंभाचा कार्यक्रम अलिबाग येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात संपन्न झाला.तर संध्याकाळी ते कार्यरत असलेल्या रसायनी पोलीस ठाण्यात पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला.पोलीस दलात गेली ४० वर्ष अविरतपणे व निष्कलंक वृत्तीने प्रामाणिक अत्यंत चोखपणे सेवा पार पाडल्याने रायगड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष व कर्तबगार पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे यांनी पोलीस उपनिरीक्षक वसंत म्हामुनकर यांचा जिल्हा पोलीस प्रशासनाकडून येथोयचीत सन्मान करत पोलीस अधीक्षक श्रीयुत घार्गे यांनी श्री.म्हामुणकर यांनी गेली ४० वर्ष पोलीस दलात प्रामाणिकपणे सेवा बजावल्याबद्दल त्यांचे कौतुक करुन त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी रायगड जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री.शिवतारे यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते…सायंकाळी रसायनी पोलीस ठाण्यात श्री. म्हामुनकर यांचा सेवानिवृत्ती निरोप समारंभाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संजय बांगर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या निरोप समारंभ प्रसंगी रसायनी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद हंबीर,पोलीस उपनिरीक्षक महेश धोंडे, म्हामुणकर यांचे थोरले बंधू सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक रामराव म्हामुनकर,नंदकुमार साळेकर,म्हामुनकर यांचे भाचे,आदर्श शिक्षक संगीत रायगड भूषण संजय घाडगे, नाभिक समाजाचे रायगड जिल्हा अध्यक्ष सुदाम शिंदे,मंगल पारधी यांच्यासह त्यांचे हितचिंतक मित्रपरिवार नातेवाईक त्याचबरोबर रसायनी पोलीस ठाण्याचे अधिकारी,कर्मचारी, पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी रसायनी पोलीस ठाण्याच्या वतीने सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक श्री. म्हामुनकर व सौ.वर्षा म्हामुनकर यांचे पुष्पगुच्छ,शाल तसेच भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. यावेळी रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस पाटील यांच्या वतीने श्री म्हामुनकर यांचे शालू भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रसायनी पोलीस ठाण्याचे गोपनीय अंमलदार राहुल भडाले,मंगेश लांगी,यांच्यासह सर्व पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली…