अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-
अलिबाग-पेण मार्गावरील पोयनाड भागात ऐन दिवाळीत शनिवारी दि.2 ऑक्टोबर सकाळपासूनच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या…यातून मार्ग काढताना प्रवाशांची तारांबल उडाली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे…दि.3 ऑक्टोबरला भाऊबीज असल्याने मोठ्या प्रमाणात चाकरमानी तसेच पर्यटक अलिबागच्या दिशेने येत आहेत…यामुळे सर्वसामान्यांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे…