उरण शिवसत्ता टाइम्स (प्रविण पाटील):-
उरण करंजा रस्त्याचे काम सुरू झाले आहे…परंतु सदर रस्त्याचे काम ठेकेदाराकडून निकृष्ठ दर्जाचे सुरू आहे…याकडे शासकीय यंत्रणेचे आर्थिक साटेलोटामुळे दुर्लक्ष होत असल्याचा संशय ग्रामस्थांकडून व्यक्त केला जात आहे…ठेकेदार राजकीय असल्याने राजकीय दबावाचा वापर करून काम सुरू आहे…ठेकेदारांच्या या कामांचे व इतर ठिकाणी सुरू असलेल्या कामांची सखोल चौकशी केली तर नक्कीच घोटाळा बाहेर पडेल अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे…उरण करंजा रस्त्याची दुर्दशा झाल्याने पावसाळ्यानंतर रस्त्याचे काम ठेकेदारांनी सुरू केले आहे…परंतु सदरचे काम हे निकृष्ठ दर्जाचे सुरू आहे…याबाबत चाणजे ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी करूनही त्याची दखल शासकीय यंत्रणा ठेकेदाराशी असलेल्या आर्थिक साटेलोटामुळे दखल घेत नसल्याचे चित्र पहावयास मिळते…करंजा रस्त्यावर मोरी बांधण्याचे काम सुरू आहे…त्याठिकाणी स्टील,लोखंडी सळ्यांचा वापर न करता काम केले जात आहे…यामुळे सदर कामांचे दर्जा निकृष्ठ दर्जाचे असल्याचे उघड होते…
ठेकेदारांनी इतर अनेक ठिकाणी कामे सुरू केले आहेत…ती कामेही निकृष्ट सुरू आहेत…सदर ठेकेदारांच्या कामांची सखोल चौकशी केली तर नक्कीच घोटाळा उघड होऊन ठेकेदारास ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची वेळ आली आहे…परंतु शासकीय अधिकाऱ्यांना आर्थिक मानधन मोठया प्रमाणात मिळत असल्याने ते कारवाई अथवा चौकशी करण्याऐवजी मलिंदा घेऊन बिले पास करून जनतेच्या जीवाशी खेळत आहेत…तरी या अधिकारी वर्गाच्या मालमत्तेची चौकशी झाली तर ते मालामाल असल्याचे उघड होईल…