चित्रलेखा पाटीलांची अलिबागमधील शिवसेना कार्यालयाला भेट… शिवसेनेकडून चित्रलेखा पाटील यांचे जंगी स्वागत…

0
67

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):- 

महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार चित्रलेखा पाटील यांनी गुरुवारी दुपारी अलिबागमधील शिवसेना कार्यालयाला भेट दिली…त्यांच्या कार्यालयासमोर आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. ढोल- ताशांच्या गजरात त्यांचे जंगी स्वागत केले. शिवसेना कार्यालयातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस चित्रलेखा पाटील यांनी अभिवादन केले…यावेळी शिवसेनेचा आणि महाविकास आघाडीचा विजय असो अशी घोषणा देण्यात आली…एक वेगळा उत्साह कार्यकर्त्यांमध्ये दिसून आला. दरम्यान, चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांची अलिबाग शहरात मिरवणूक काढण्यात आली…या मिरवणुकीत असंख्य शिवसैनिक व शेकापचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.