Thursday, November 21, 2024
Homeपनवेल / उरण / रायगडरायगड जिल्ह्यात काँग्रेसचे अस्तित्व दाखवण्यासाठी लढत आहेत...स्वर्गीय मधुकर ठाकुरांचे सुपुत्र, राजाभाऊ ठाकूर...

रायगड जिल्ह्यात काँग्रेसचे अस्तित्व दाखवण्यासाठी लढत आहेत…स्वर्गीय मधुकर ठाकुरांचे सुपुत्र, राजाभाऊ ठाकूर…

श्रीवर्धन शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील ) :-

श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात काटे की टक्कर निर्माण झाली आहे, ती निव्वळ काँग्रेसचे उमेदवार राजाभाऊ ठाकूर यांच्यामुळे.. राजाभाऊ ठाकूर स्वर्गीय माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे सुपुत्र आहेत ते निव्वळ काँग्रेसचे अस्तित्व दाखवण्यासाठी लढत आहेत… त्यामुळे जिल्हाभरातील काँग्रेसची फौज राजाभाऊंच्या मागे उभी राहिली आहे… श्रीवर्धनमधील काँग्रेसचा जुना कार्यकर्ता राजाभाऊंच्या डॅशिंग नेतृत्वामुळे सरसरून स्वाभिमानाने उभा राहिला आहे…. त्यामुळे श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा पहिल्या सारखा बालेकिल्ला होईल अशी चिन्हे आहेत…
श्रीवर्धन विधानसभा मतदार संघ बॅरेस्टर अंतूलेनी विकास कामातून काँग्रेसचा बालेकिल्ला तय्यार केला होता.. बॅरिस्टर अंतुलेंकडे विकासाचे व्हिजन होते.. तेच विजन काँग्रेस उमेदवार राजाभाऊ ठाकु्रांकडे आहे… राजाभाऊ हे बॅरिस्टर अंतुले यांच्या विचारांचे वारसदार आहेत… म्हणूनच ते निवडणुकीचा प्रचार करण्यापूर्वी बॅरिस्टर अंतुलेंच्या समाधीस्थळी गेले… तेथे नतमस्तक होऊन त्यांनी मरहुम अंतुले पती पत्नी यांच्या कबरीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले हेच आशीर्वाद राजाभाऊंना विजयाकडे घेऊन जाणार आहेत… विरोधकांनी श्रीवर्धन विधानसभा मतदार संघाची नव्याने निर्मिती झाल्या पासून अजिबात विकास केलेला नाही फक्त सत्ता तेवढी भोगली…. आजही श्रीवर्धन मधील लोक रस्ता आणि पाणी या पासून वंचित आहेत… विरोधकांनी श्रीवर्धन, म्हसळा, तळा, रोहा येथे नव्याने उद्योगधंदे आणलेले नाहीत… रोह्यातील उद्योगधंदे पूर्वीपासूनच आहेत… उलट येथील सत्ताधाऱ्यांनी ते उद्योग बंद पाडून बेरोजगारी वाढवलेली आहे…. श्रीवर्धन मधील मच्छिमार तसेच शेकऱ्यांचे प्रश्न कायम आहेत….. त्यामुळे श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर काँग्रेसचे उमेदवार राजाभाऊ ठाकूर यांना जनतेने आमदार म्हणून निवडून द्यावे… असे आवाहन करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments