महाड शिवसत्ता टाइम्स (रेश्मा माने):-
महाड तालुक्यातील साकडी या गावातील तरुणाला त्याच्याच भावाने लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेबाबत महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष भागुजी जगताप असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्याच्या डोक्यामध्ये 11 टाके पडल्याने त्याला प्रथम बिरवाडी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु जखम गंभीर असल्याकारणाने संतोष याला अधिक उपचार करिता मुंबई येथे पाठविण्यात आले आहे. तर आरोपी हा त्याचाच भाऊ कैलास जगताप आणि इतर भीवघर येथील रहिवाशी असलेले दोघे तरुण अद्यापही मोकाट फिरत आहेत. कैलास जगताप हा गुन्हेगार प्रवृत्तीचा व्यक्ती असून त्याने मागील काही महिन्यापूर्वी बिरवाडी येथे मोबाईल शॉपी दुकानातील कामगाराला देखील बेदम मारहाण केली होती. जखमी संतोष जगताप याला अधिक उपचाराकरिता मुंबई येथे पाठविण्यात आले असून जर माझ्या भावाचे काही बरे वाईट झाले तर याला कैलास जगताप आणि इतर दोघे जबाबदार असतील तसेच पोलिसांनी योग्य ती चौकशी करून या तिघांवर हाफ मर्डरचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी संतोष जगताप याच्या भावाने केली आहे. तसेच कैलास जगताप याच्यापासून आमच्या जीवाला धोका असून पोलिसांनी त्याच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी देखील जखमी संतोष च्या नातेवाईकांनी केली आहे …