आळंदी देवाची पायी वारी दिंडीला सुरुवात… विठू नामाचा जयघोष करीत वारकऱ्यांचे आळंदीकडे प्रस्थान…

0
71

चौक शिवसत्ता टाइम्स  (अर्जुन कदम) :- 

आज कार्तिकी एकादशीनिमित्त देवाची आळंदीकडे टाळ मृदंगाच्या गजरात, विठू नामाचा जयघोष करीत वारकऱ्यांचे प्रस्थान सूरू झाले आहे… चौक परिसरातून दिंड्या निघाल्या आहेत… पंढरपूरची आषाढी एकादशी नंतर आजची कार्तिकी एकादशी मोठी एकादशी म्हणून देखील ओळखली जाते… या दिवशी वारकरी संप्रदयातील तसेच वैष्णव पंथिय एक दिवसाचे उपवासाचे व्रत करतात… आजचा दिवस चातुर्मास व्रताचा हा शेवटचा दिवस मानला जातो… कार्तिक शुद्ध एकादशी हिला प्रबोधिनी एकादशी किंवा बोधिनी एकादशी असेही वारकरी संप्रदयात म्हटले जाते… या दिवशी भगवान विष्णू त्यांच्या चातुर्मासातल्या चार महिन्यांच्या योग निद्रेतुन जागे होतात व पुन्हा या सृष्टीच्या पालनाचा कार्यभार स्विकारतात असे मानतात… त्यामुळे हिला देवोत्थनी, देव उठी एकादशी असेही म्हणतात… तुलसी विवाहाची सुरुवात याच दिवसापासून सुरु होते… कार्तिक पौर्णिमेला तुलसी विवाहाची सांगता होते आणि लग्नसराईचे दिवस सुरू होतात… पंढरीच्या विठुरायाचे स्मरण करण्याचा, त्याच्या नावाने उपवास करण्याचा आजचा दिवस मानला जातो… चौक परिसरातून निघालेल्या वारकरी दिंडीला निरोप देण्यासाठी वारकरी पंथाला जोपासणारा भक्त उपस्थित होतो… यावेळी महिलांनी डोक्यावर तुळस घेतली होती तर काहींच्या डोक्यावर ज्ञानेश्वरी अध्याय होता… टाळ मृदूंगाच्या  गजरात विठू नामाचा जयघोष करीत या दिंड्यांनी प्रस्थान केले… आजपासून खोपोली साजगाव येथे बोंबल्या विठोबाची पंधरा दिवसांची जत्रा देखील भरते…