उरण शिवसत्ता टाइम्स (प्रविण पाटील) :-
आगरी समाजाविरुद्ध गरळ ओकणाऱ्या महेश बालदी विरोधात आगरी समाजाबद्दल अवमानकारक शब्द वापरल्याने समाजाची माफी मागावी या बाबतीत दि १२ नोव्हेंबर रोजी चा मोर्चा स्थगित.
महेश बालदी यांनी आगरी समाजाबद्दल अवमानकारक शब्द प्रयोग केल्यामुळे त्यांनी समाजाची माफी मागावी या मागणीसाठी दिनांक १२ नोव्हेंबर २०२४ रोजी उरण पोलीस स्टेशनसमोर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते…
दिनांक ९ नोव्हेंबर २०२४ रोजी उरण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्री.मिसाळ साहेब यांच्या सोबत मोर्चा संदर्भात चर्चा झाली… विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, सर्वत्र आदर्श आचारसंहिता लागू असल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो… तसेच हा सामाजिक प्रश्न आहे… त्यामुळे आचारसंहितेच्या कालावधीपर्यंत मोर्चा स्थगित करण्यात यावा अशा सूचना वरिष्ठांकडून येत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली… या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून सामाजिक कार्यकर्त्यांनी सदरहू मोर्चा आचारसंहितेच्या कालावधिपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती गोपाळ पाटील, अध्यक्ष-उरण उत्कर्ष समिती सुधाकर पाटील, अध्यक्ष – उरण सामाजिक संस्था आणि रूपेश पाटील, शेतकरी संघटना यांनी प्रेसनोटद्वारे दिली आहे…