Thursday, November 21, 2024
Homeक्राईम न्यूजपेणमध्ये गांजाची विक्री करणाऱ्या आरोपीस अटक...१ लाख ७५ हजार ८४० रुपये किमतीचा...

पेणमध्ये गांजाची विक्री करणाऱ्या आरोपीस अटक…१ लाख ७५ हजार ८४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त…

शिवसत्ता टाइम्स पेण (वार्ताहर ) :-

रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे आणि अप्पर पोलीस अधिक्षक अभिजीत शिवथरे यांनी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुशंगाने आचार संहितेच्या काळात अमली पदार्थांची तस्करी, विक्री आणि वापर करणाऱ्यांवर एनडीपीएस अंतर्गत कारवाई करण्यासंदर्भात सुचना दिल्या होत्या…. त्या अनुशंगाने १० नोव्हेंबर रोजी आरोपी सुशिल राजाराम जोशी वय ३८ वर्ष राहणार – नविन वसाहत, फणसडोंगरी, पेण याला अटक केली आहे…

पेण पोलीस ठाण्याचे पो.ना.राकेश पवार यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी सुशिल राजाराम जोशी हा स्कुटी वाहनाने गांजा या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी म्हाडा कॉलनी येथे येणार असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांना पुढील कारवाई करण्याबाबत लेखी परवानगी मागीतली होती… पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांना मिळालेल्या परवानगी नुसार पेण पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांच्या दोन टिम तयार करून सापळा रचून सुशिल राजाराम जोशी हा त्यांच्या स्कुटीवरून जात असताना त्यास एका टिमने थांबविण्याचा प्रयत्न केला असता, त्याने स्कुटीचा स्पिड वाढवुन तो पळुन जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस पकडून त्याच्याकडे असलेला १ लाख ७५ हजार ८४० रुपये किमतीचा गांजा हा अमली पदार्थ आणि इतर मुद्देमाल जप्त केला… ही कारवाई पेण पोलीस ठाण्याचे अधिकारी सहा.पो.नि/निलेश राजपुत, सहा. फौ. ढोबळे, म.पो.ना शिंदे, पो.हवा. कदम, पो.ना. राकेश पवार, पो. हवा. माने आदींनी केली. तर सदर गुन्हयाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे व पेण पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पो.नि. निलेश राजपुत हे करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments