म्हसळा शिवसत्ता टाइम्स (गणेश म्हाप्रळकर ) :-
रायगडच्या म्हसळा तालुक्यातील मिहीर मनोहर कांबळे या चार वर्षीय मुलाला रात्री विंचू दंश झाला… या मुलाला पुढील उपचाराकरिता म्हसळा येथील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले…मात्र यावेळी या दवाखान्यात डॉक्टरांकडून योग्य ते उपचार न मिळाल्याने या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी संताप व्यक्त केलाय…डॉक्टरांनी दाखवलेला अविश्वास आणि उपचार करण्यासाठी उशिर झाल्यामुळे आमच्या मुलाचा मृत्यू झाल्याचा नागरिकांनी गंभीर आरोप केलाय…त्यामुळे या दवाखान्यात आज सकाळपासूनच या मुलाच्या नातेवाईकांनी गदारोळ केल्याचे पाहायला मिळते…