स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची १२ वी पुण्यतिथी संपन्न… तमाम शिवसैनिकांकडून बाळासाहेबाना वंदन…

0
48

मुंबई शिवसत्ता टाइम्स (शेखर म्हात्रे):- 

हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या १२ व्या स्मृतिदिनानिमित्त शिवतीर्थावर काल निष्ठा श्रद्धा आणि भक्तीचा त्रिवेणी संगम झाला होता…मुंबई,महाष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून लाखो शिवसैनिकांचा महासागर शिवतीर्थावर लोटला होता… लाडक्या साहेबांच्या आठवणींना उजाळा देत समस्त हिंदू,निष्ठावंत शिवसैनिक,शिवसेनाप्रेमी आणि अबालवृद्ध नागरिक स्मृतीस्थळावर पुष्पपर्ण करून नतमस्तक झाले… शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,रश्मी ठाकरे आणि शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे,दक्षिण मध्य मुंबई खासदार अनिल देसाई यांनीही स्मृतीस्थळावर बाळासाहेबांच्या तसबिरीवर चाफ्याची फुले वाहून बाळासाहेबांना वंदन केले… यावेळी शिवसेनाप्रमुखांच्या जयघोषाने स्मृतिस्थळाचा परिसर दुमदुमला होता…