खोपोली शिवसत्ता टाइम्स (खलील सुर्वे ) :-
महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघात 20 नोव्हेंबरला मतदान झाले, त्यानंतर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी झाली…या विधानसभा निवडणुकीत कर्जत-खालापूर 189 मतदारसंघात तिरंगी लढत पहावयास मिळाली.
या मतदारसंघात एकूण 3 लाख 18 हजार 742 मतदार असून त्यापैकी 2 लाख 40 हजार 10 मतदारांनी मतदान केले. या तिरंगी लढतीत महेंद्र थोरवे, सुधाकर घारे व नितीन सावंत यांच्यात लढत झाली. या लढतीत पहिल्या फेरीपासून ते 17 व्या फेरीपर्यंत अपक्ष उमेदवार यांनी 915 मतांची आघाडी कायम ठेवली, त्यानंतर 18 व्या फेरीपासून 26 व्या फेरीपर्यंत महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांना खोपोली, खालापूरमधून आघाडी मिळाली आणि ती शेवटपर्यंत टिकून राहिली. यामध्ये महेंद्र थोरवे यांना एकूण 94 हजार 511 मतदान झाले. तसेच अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांना एकूण 88 हजार 750 मतदान झाले तसेच नितीन सावंत यांना एकूण मतदान 48736 झाले. महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांना 5 हजार 761मताधिक्य मिळाले व त्यांचा विजय झाला. यावेळी नोटाला 1 हजार 946 मते मिळाली. या मतदार संघात अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली. खालापूर व खोपोलीमधील कार्यकर्त्यांनी यशस्वी मेहनत घेवून आमदार महेंद्र थोरवे यांना विजय मिळवून दिला…तसेच शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी खालापूर व खोपोलीमधील महायुतीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचे व सामाजिक सर्व संघटना,व्यापारी असोशियन यांचे मनःपूर्वक आभार मानले.