महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):-
दोन-चार दिवसांपूर्वी महाड तालुक्यातील नावाजलेली ग्रामपंचायत कांबळे तर्फे बिरवाडी गावचे सरपंच सुनील खंडेराव देशमुख आणि ग्रामसेवक यांनी कांबळे ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचार केला असल्याची बातमी एका युट्युब न्यूज चॅनल मार्फत प्रसिद्ध झाली होती…काल दिनांक 19 ऑगस्ट रोजी सरपंच सुनील देशमुख, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि काही आजी-माजी सरपंच यांनी पत्रकार यांना बोलावून आपली बाजू मांडली असून ग्रामपंचायतमध्ये कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार झाला नसल्याचे सांगितले असून संबंधित महिलेने केलेले आरोप हे निराधार असून या सर्व कामांची अदा केलेली बिले कार्यालयात असून केवल अक्सापोटी ऑडिट करणाऱ्या महिला अधिकाऱ्यांनी विरोधकांना ही बातमी देऊन आमच्या गावचे नाव बदनाम केले आहे यासंदर्भात आम्ही वरिष्ठांकडे दाद मागितली आहे आमच्या ग्रामपंचायतचे पुनर ऑडिट व्हावे अशी मागणी आम्ही स्वतः प्रशासनाकडे केली आहे ज्या महिला अधिकारी आमच्याकडे ऑडिट साठी आल्या होत्या त्यांनी विरोधकांशी हात मिळवनी करत आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. संबंधित महिला ऑडिटर आमच्या ग्रामपंचायतचे ऑडिट करण्यासाठी पाठवू नयेत असा लेखी अर्ज आम्ही सहाय्यक संचालक स्थानिक लेखापरीक्षक अलिबाग यांच्याकडे केला होता त्याचाच राग मनात धरून हा खोटा अहवाल दिला असावा असा आमचा आरोप आहे. त्याच पद्धतीने ऑडिटर महिला अधिकाऱ्यांनी आमच्याकडे ऑडिट साठी अवास्तव रकमेची मागणी केली होती आम्ही ती पूर्ण करू शकलो नाही म्हणून आमच्यावरती असे खोटे आरोप झाले असल्याचे सांगत आम्ही आमच्या ग्रामपंचायतचे पुनर ऑडिट व्हावे अशी मागणी आम्ही संबंधित यंत्रणांकडे केले आहे. यामध्ये आम्ही दोषी आढळल्यास शासनामार्फत होणाऱ्या कारवाईला आम्ही सामोरे जाऊ आणि वेळप्रसंगी आम्ही राजीनामा देऊन असे सरपंच सुनील देशमुख यांनी सांगितले आहे. आणि जर आरोप सिद्ध झाले नाहीत तर मात्र ज्यांनी ग्रामपंचायतीची निराधार बदनामी केली त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करून असे स्पष्ट संकेत ग्रामपंचायत कांबळे तर्फेबिरवाडी च्या वतीने देण्यात आले आहेत. यावेळी गावातील माजी सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याच पद्धतीने ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ यांनी देखील ग्रामपंचायत कांबळे तर्फे बिरवाडी मध्ये कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार झाला नसल्याचे स्पष्ट संकेत देत ही आमच्या गावची बदनामी आहे आणि ती खपवून घेतली जाणार नाही असा इशारा दिला आहे.एकंदरीत पाहता एका बलाढ्य कंपनीच्या ठेक्याचा वाद हा संपूर्ण गावच्या बदनामीच कारण ठरतो की काय? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे…