मोरबे धरण पूर्ण क्षमतेने भरले, दरवाजे उघडले… नवी मुंबई व पनवेलसाठी पाण्याचा पुरवठा सुरळीत…

0
4

चौक शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम):-

रायगड जिल्ह्यातील मोरबे धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने आज पहाटे तीन वाजता धरणाचे दरवाजे उघडून पाणी सोडण्यात आले. हे धरण नवी मुंबई महानगर पालिका व पनवेल महानगर पालिका यांच्या खारघर आणि कामोठे भागाला पाणी पुरवते.आज ७५ सेंटीमीटर उचललेल्या दरवाजातून ३,११५ क्युसेस पाणी सोडण्यात आले, ज्याचे दृश्य अतिशय मनमोहक आहे. नागरिक धरणाजवळ जाऊन या नयनरम्य दृश्याचा आनंद घेत आहेत.

धरण माथेरान जवळ धावरी नदीवर बांधण्यात आले असून, त्याची लांबी ३,२५० मीटर आहे. पाणलोट क्षेत्र ५७.८९ चौ.किमी असून,जलमग्न क्षेत्र ९.७८ चौ.किमी इतके आहे. दररोज सरासरी ०.४८ एमसीएम पाणी वापरले जाते…धरणाचा एकूण जलसाठा १,९०,८९० एमसीएम असून, बाष्पीभवनामुळे १०.६८ एमसीएम पाणी गमावले जाते. पाणी वापरण्यास योग्य साठा १३५.६७३ एमसीएम आहे.

आजच्या पाण्याच्या प्रमाणानुसार, मोरबे धरणातून पुरवठा २८२ दिवस चालेल, म्हणजे २७ मे २०२६ पर्यंत पाणी पुरेल. पाणी सोडण्याच्या कार्यक्रमात कार्यकारी अभियंता पडघम, उप अभियंता आंबेडकर, कनिष्ठ अभियंते कोरपळे व पाटील आणि मोरबे धरणाचे कर्मचारी उपस्थित होते.मुसळधार पावसामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरले. गेल्या वर्षी २९ ऑगस्ट रोजी पाणी सोडण्यात आले होते…धरणातून सुटणारे पाणी परिसरातील पर्यावरणासाठी देखील महत्वाचे आहे आणि नागरिक याचा आनंद घेत आहेत.