रायगड शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):-
नेहुली येथील मतमोजणी केंद्र येथील पत्रकार कक्ष जिल्हास्तरीय करणार अशी सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी काही दिवसापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत संबधित अधिकारी यांना केली होती… मात्र त्यांच्या या सूचनेला संबधित विभागाकडून केराची टोपली दाखविण्यात आली… विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 च्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सांगितले होते की, रायगड जिल्ह्याचे मुख्यालय ठिकाण आहे. त्यामुळे अलिबाग विधानसभा मतदार मोजणी केंद्र येथे असणारा पत्रकार कक्ष हा जिल्हास्तरीय पत्रकार कक्ष साजेसा करण्यात यावा… त्या कक्षात प्रसार माध्यम यांच्यासाठी आवश्यक सोयी सुविधा पुरविण्यात येतील… मात्र नेहुली येथील मतमोजणी केंद्र ठिकाणी असणाऱ्या पत्रकार कक्षाची परिस्थिती ही पूर्णपणे उलट होती…
नेहुली येथील मतमोजणी केंद्र ठिकाणी असणाऱ्या पत्रकार कक्षात वायफाय, संगणक यांची सुविधा नव्हती… पत्रकार कक्षात फक्त प्रिंटर दाखविण्यासाठी ठेवण्यात आला होता… पत्रकार कक्षात प्रसारमाध्यम प्रतिनिधीसाठी वायफाय नसल्याने बातम्या पाठवण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली होती… काही पत्रकार हे मतमोजणी केंद्राबाहेर जावून बातम्या पाठवीत होते… पत्रकार कक्षातील टेबल स्टँड फॅन देखील बंद अवस्थेत होते… तसेच जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघाच्या नवव्या फेरी पूर्ण झालेली प्रत ग्रुपवर मिळाली तरी अलिबाग विधानसभेची पहिली प्रत ही अधिकृतरीत्या पत्रकार कक्षाला प्राप्त झाली नव्हती… पत्रकार कक्षात चार पाच मोठ्या स्क्रीन लावण्यात येतील असे सांगितले तर त्याठिकाणी फक्त दोन टीव्ही स्क्रीन लावण्यात आल्या होत्या… पत्रकारकक्षाच्या आतील भिंतीवर असणारे जाळे देखील काढण्यात आले नव्हते… त्याचप्रमाणे उमेदवारांचे प्रतिनिधींचा पत्रकार कक्षात सतत वावर सुरू होता… त्याचप्रमाणे शासकीय अधिकारी कर्मचारी देखील या कक्षात ठाण मांडून बसले होते… त्यामुळे पत्रकार कक्ष हा शासकीय कर्मचारी अधिकारी राजकीय पक्ष उमेदवार यांचा कक्ष दिसत होता… जिल्हा निवडणूक अधिकारी हे नेहुली येथील मतमोजणी केंद्र ठिकाणी असणाऱ्या पत्रकार कक्षाची स्थिती कशाप्रकारे आहे याची साधी पाहणी केली नाही…