पेण शिवसत्ता टाइम्स (प्रदीप मोकल) :-
पेण तालुक्यातील कारावी गावचे रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष गजानन मोकल यांनी आपला नातू भाग्य संदेश मोकल याचा वाढदिवस चाईल्ड हेवन वसतीगृहातील गरीब गरजू विद्यार्त्यांना जिवनोपयोगी वस्तूंचे वाटप करून साजरा केला… समाजातील गरीब गरजू मुलांना शिक्षण घेताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते… आपण त्यांना या कामात थोडीफार मदत करावी या उद्देशाने गजानन मोकल यांच्या कुंटुबाने निर्णय घेऊन आपला नातू भाग्य मोकल याच्या वाढदिवसानिमित्त चाईल्ड हेवन वसतीगृहातील विद्यार्त्यांना जिवनाउपयोगी साहीत्य वाटप करुन वाढदिवस साजरा केला… यावेळी गजानन मोकल, वत्सला मोकल, संदेश मोकल, सुप्रिया पाटील, सचिन पाटील आदिंसह विद्यार्त्यांना शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते…