मुंबई शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
मराठीत तिकीट मागितले तर हिंदीतच बोला, अशी जबरदस्ती नाहूर रेल्वे स्थानकातील तिकिट खिडकीवरील कर्मचार्याने केल्याच्या प्रकार समोर आला आहे… अमोल माने या प्रवाश्याशी हा संपूर्ण प्रकार घडला असून मराठी एकीकरण समितीने यात हस्तक्षेप करत रेल्वे प्रशासनाकडे लेखी तक्रार केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमोल माने हे नाहूर स्थानकात लोकलचे तिकिट काढण्यास गेले असता तिथल्या कर्मचाऱ्याशी मराठीत बोलू लागले… मात्र त्या कर्मचाऱ्याने हिंदीत बोला, असे अमोल माने यांना सांगितले… मात्र मी मराठीतच बोलणार, असा आग्रह माने यांनी केला असता त्या कर्मचाऱ्याने उद्धट बोलण्यास सुरुवात केली… दरम्यान, याचा व्हिडिओ माने यांनी मोबाईलमध्ये काढण्यास सुरुवात केली… त्यानंतर त्यांनी या कर्मचाऱ्याची रेल्वे प्रशासनाकडे लेखी तक्रार ही केली आहे. या प्रकरणी कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही आता मराठी एकीकरण समितीने केली आहे… दरम्यान या सर्व पप्रकरणाचा एक व्हिडिओ मराठी एकीकरण समितीने त्याच्या फेसबुकवर पोस्ट करत समोर आणला… त्यामुळे मुंबईत पुन्हा एकदा मराठी भाषेचा अवमान होणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे… केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे… अगदी त्यावर बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलिकडे मराठी भाषेबाबत तोंडभरून कौतुक करत मराठीचे महत्व पटवून दिले होते… मात्र आता भाजपचे सरकार येताच ही सर्व अरेरावी सुरु झाली आहे… अशी चर्चा सुरु आहे… दरम्यान मराठी प्रवाशावर हिंदी बोलण्यासाठी मुजोरी करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्याच्या उदामपणाविरोधात शिवसेनेने उद्धव बाळासाहेब ठाकरे रेल्वे प्रशासनावर धडक देत कारवाईची जोरदार मागणी केली… यानंतर प्रशासनाने कर्मचाऱ्याची कानउघडणी केल्याचे समजते…