वरसोली समुद्र किनाऱ्यावर मराठी महोत्सवाचे आयोजन… १८ डिसेंबर ते २२ डिसेंबर कालावधीत होणार महोत्सव…

0
57

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर ) : –

वरसोली समुद्र किनाऱ्यावर महाराष्ट्राचा मराठी महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे… १८ डिसेंबर ते २२ डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या या महोत्सवाला नामवंत कलाकार आपली कला सादर करणार आहेत. या शिवाय विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पहायला मिळणार आहे…टुडेज युथ सोशल फाऊंडेशनच्यावतीने या महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे…महाराष्ट्रातील लाडका डिजे क्रेटेक्स आणि गायक संजु राठोड प्रथमच अलिबागमध्ये या महोत्सवाच्या निमित्ताने आपली कला सादर करणार आहेत. टुडेज युथ सोशल फाऊंडेशन या संस्थेची स्थापना सहा वर्षापूर्वी करण्यात आली होती. गेली सहा वर्ष ही संस्था आदिवासी विभागात महिलांच्या आरोग्य विषयक समस्या आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहेत. २५ हजारहून अधिक आदिवासी महिलांना सॅनिटरी पॅड वितरणाचे काम संस्थेच्या माध्यमातून केले जात आहे. संस्थेच्या माध्यमातून वर्षभर राबविल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमांसाठी निधी उभारता यावा या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे…