महाड शिवसत्ता टाइम्स (रेश्मा माने ) :-
महाड तालुक्यातील मौजे आसनपोई गावच्या हद्दीत प्रीव्ही स्पेशालिटी कंपनी बाहेर दारूच्या वादातून एका मित्राने आपल्याच मित्राच्या डोक्यात लोखंडी पाइपने हल्ला केल्याची घटना घडली आहे… प्रोसेनजीत शांती दास वय – 27 सध्या राहणार महाड एमआयडीसी प्रीव्ही स्पेशालिटी कंपनी, मूळ राहणार पश्चिम बंगाल असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून मिथिलेश जवाहर सिंग वय 25 सध्या राहणार महाड एमआयडीसी प्रिव्ही स्पेशालिटी कंपनी, मूळ राहणार बिहार, असे आरोपीचे नाव असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे… दि.2 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी बिरबल नगीना यादव व आरोपी आणि जखमी असे तिघेजण एकत्र जेवण करीत असताना दारू वाटण्याच्या वादातून आरोपी याने रागाच्या भरात केलेले जेवण रूमच्या बाहेर फेकून दिले… यावरून जखमी आणि आरोपी या दोघांमध्ये भांडण सुरू झाले… यानंतर आरोपी याने त्रिमूर्ती इंजिनिअरिंग वर्कशॉप मधून लोखंडी पाईप घेऊन डोक्यावर चेहऱ्यावर जोरदार फटके मारून त्याला गंभीर जखमी केले… जखमीस प्रथम उपचारासाठी महाड ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले होते… परंतु जखम गंभीर असल्यामुळे अधिक उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले आहे… या गुन्ह्याविषयी महाड एमआयडीसी पोलीस ठाणे येथे हाफ मर्डरचा गुन्हा दाखल झाला असून या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुर्वे हे करीत आहेत.