रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
महाराष्ट्रात सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना खूपच चर्चेत राहिली आहे… राज्यातील सत्ताधारी महायुतीला पुन्हा सत्तेवर बसविण्यात या योजनेचा मोठा हातभार लागला आहे… यामुळे आता सर्वच लाडक्या बहिणींना नव्या सरकारकडून डिसेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे… नवीन सरकार सत्तारूढ होताच कदाचित याबाबतचा हप्ता वितरित होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे…दरम्यान, रायगडमध्ये नोव्हेंबर अखेर सहा लाख 15 हजार लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात 7,500 रुपये प्रमाणे अंदाजे 461 कोटींचा निधी वितरित करण्यात आला आहे…लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने कल्पकता वापरून महिला मतदारांना आपल्या बाजूने वळविण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली. त्यानुसार पात्र महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये प्रमाणे जुलै ते नोव्हेंबर अखेरच पाच महिन्यांचे 7500 अशी रक्कम वितरित करण्यात आली… रायगडातही या योजनेला उदंड प्रतिसाद लाभला. जिल्ह्यातून सुमारे 6,25,963 अर्ज प्राप्त झाले…त्यामधून 6 लाख 15 हजार 284 अर्जाना जिल्हा प्रशासनाने पूर्ण पडताळणीनंतर मंजुरी दिली…त्यानुसार या पात्र महिलांच्या बँक खात्यात नोव्हेंबर अखेर 7,500 रुपयांप्रमाणे निधी जमा करण्यात आला आहे…याचाच अर्थ रायगडातील 6 लाख 15 हजार बहिणींच्या बँक खात्यात आतापर्यंत 461 कोटी रुपये जमा झाल्याचा अंदाज आहे…रायगडात सध्या असलेल्या 6 लाख 15,284 लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात 129 कोटी, 20,96,400 रुपयांचा निधी जमा होण्याची शक्यता आहे…