मुंबई शिवसत्ता टाइम्स (आनंद पवार) :-
भारताचे भाग्यविधाते जगदवंदनीय घटनेचे थोर शिल्पकार विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा ६८ व्या महापरिनिर्वाणदिनी दादरच्या चैत्यभूमीवर विविध राज्यातून लाखोंच्या संख्येने भीम अनुयायी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी दाखल होणार आहेत….
भारताचे भाग्यविधाते व बहुजन समाजाचे मुक्ती दाते विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा ६८ वा महापरिनिर्वाण दिन शुक्रवार दि.६ डिसेंबर रोजी असून आपले उद्धारकर्ते मुक्तीदात्याला नतमस्तक व अभिवादन करण्यासाठी दादरच्या चैत्यभूमीवर जगभरातून लाखोंच्या संख्येने दरवर्षी भीम अनुयायी उपस्थित राहतात….