रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
इंदिरा गांधी यांच्या निधनानंतर देशभरात काँग्रेससाठी सहानुभूतीची लाट पसरली होती…मात्र महाराष्ट्रातील एक मतदारसंघ असा होता की,ज्याच्यावर याचा कोणताही परिणाम झाला नाही… कारण त्याठिकाणी शेकापचे नेते निवडून आले होते… तो मतदारसंघ म्हणजे रायगड जो आधी कुलाबा मतदार संघ म्हणून ओळखला जायचा… पूर्वीपासूनच रायगडातील अलिबाग,पेण मतदारसंघात शेकापची ताकद जास्त होती… मात्र हळूहळू शेकापचे वर्चस्व कमी होऊ लागले…पण या निवडणुकीत शेकापचा बुरुज पूर्णतः ढासळला…शेकापचेच शिलेदार महेंद्र दळवी यांनी या बुरुजला सुरुंग लावला असून आतापर्यंत पाटील कुटुंबातील चार जणांचा वेगवेगळ्या निवडणुकांत पराभव केला आहे…विधानसभा निवडणुकांमध्ये शेकाप हा आपली रायगडमधील अस्तित्वाची लढाई हरला. त्याचीच चर्चा सध्या जिल्ह्यात सुरु आहे. त्यात अलिबाग हा शेकापचा बाल्लेकिल्ला. तेथे शेकाप आपले अस्तित्व टिकवेल अशी आशा होती… मात्र हा बुरुजही या निवडणुकीत पुन्हा एकदा ढासळला आहे…दळवी यांनी २००६ शेकापला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला…२०११ साली जिल्हा परिषद निवडणुकीत शेकापने जयंत पाटील यांचे पुत्र नृपाल पाटील यांना थळ गणातून उमेदवारी दिली होती. त्यांच्या विरोधात दळवी यांनी निवडणूक लढवली…नृपाल पाटील यांचा २०८१ मताने पराभव केला.२०१४ मध्ये राष्ट्रवादीतून दळवी शिवसेनेत जात विधानसभा लढवली. मात्र कमी फरकाने त्याचा पराभव झाला. मात्र, २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते शिवसेनेकडून पुन्हा रिंगणात उतरले. त्यांच्या विरोधात शेकापतर्फे सुभाष पाटील होते. दळवी यांनी ३२ हजार मतांनी त्यांचा पराभव केला…शेकापचे जयंत पाटील निवडणूक लढवत होते. जयंत पाटील यांना अवघी १२ मते मिळाली. त्यांचा पराभव झाला. यामागे महेंद्र दळवी यांची रणनीती कामी आली…२०२४ विधानसभा निवडणुकीत शेकापतर्फे चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांना उमेदवारी देण्यात आली होती. शिवसेनेतर्फे विद्यमान आमदार महेंद्र दळवी याना पुन्हा उमेदवारी देण्यात आली. या निवडणुकीत दळवी यांनी चित्रलेखा पाटील यांचा २९ हजार मताने पराभव केला…पाटील कुटुंबातील चार जणांना निवडणुकीत महेंद्र दळवी यांनी पराभूत केले आहे…