माणगाव शिवसत्ता टाइम्स (दिपक दपके):-
मुंबई-गोवा महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच असताना पुन्हा एक भीषण अपघात झाला…नेक्सा कार व वॅगनार कार या दोन वाहनांना समोरासमोर ठोकर मारून अपघात झाल्याचे समजते…यामध्ये सात प्रवासी गंभीररित्या जखमी असून यात एका सहा वर्षीय लहान मुलीचा समावेश आहे…ती किरकोळ जखमी झाली असून दोन्ही वाहनांचे खूप नुकसान झाले आहे…मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार दि. 6 डिसेंबर 2024 रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास माणगाव बाजूकडून मुंबई बाजूकडे जात असणारी व्हॅगनार कार क्रमांक MH०१/CR-३५५३ ही गोवा-मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरुन अतिवेगाने,वेदकारपणे,रस्त्याच्या परिस्थितीकडे चालवित घेऊन जात असताना आपली कार रॉंग बाजूने घेऊन समोरुन मुंबई बाजूकडुन येणारी मारुती नेक्सा कार गाडी क्रमांक MH०८/AX-६०६८ या वाहनास समोरून जोरात ठोकर मारुन अपघात करुन दोन्ही वाहनांचे नुकसान झाले…या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांची नावे निलेश बाळा जोगळे,वर्षा अनंत चिडक,अनिता गणेश गिलडा, स्मिता शिरीष बुटाला,असून हे सर्व खेडमधील रत्नागिरी जिल्ह्यात राहत असून प्रवासी होते तर विकास तुषार भागवत,ज्योती विकास भागवत,कुमारी चार्थी विकास भागवत,वय ६ वर्षे हे भायखळा वेस्ट -मुंबईमधील प्रवासी होते…यांना लहान मोठ्या स्वरूपाची दुखापत झाली आहे…या घटनेचा अधिक तपास माणगाव पोलीस करत आहेत…