खोपोली नगरपरिषद कार्यालयासह शहरात शौचालयाची बिकट अवस्था?… मुख्य अधिकारी डॉ.पंकज पाटील यांचे खोपोली शहरावर दुर्लक्ष?

0
56

खोपोली शिवसत्ता टाइम्स (खलील सुर्वे):- 

खोपोली नगरपरिषदेची ओळख म्हणजे सर्वात श्रीमंत व जागतिक दर्जाचे शहर म्हणून ओळखले जात असून सध्या शहरची वाटचाल स्मार्ट सिटीच्या दिशेने जाताना दिसून येत आहे…खोपोली नगरपरिषद कार्यालय तीन मजली इमारत असून इमरती खाली वाहनांना पार्किंगची सुविधा देखील करण्यात आली आहे…पण या कार्यलयच्या शौचालयांमध्ये तुम्ही जाऊ शकता का?याचे उत्तर येणार ते म्हणजे “नाही”.कारण या शौचालयची दयनीय अवस्था  झाली आहे.कुजलेले दरवाजे,फाटक्या भिंतीला लागलेली चौखट ,मोडके प्लास्टिकचे फ्लॅश टॅंक,शौचालय मधून भांडा नळ गायब तर  काही नळाना पाणी येते तर काहींचे पाणी येत नसल्याने  दुर्गधवास अशी तिन्ही मजल्यावर शौचालयची अवस्था झाली आहे.तेसच गेल्या अनेक महिण्या पासून स्लॅब मधून टप टप पाणी पार्किंग मध्ये गळते मात्र हे अमृत जल नाही तर  शौचालयचे लिकेज झालेले सांडपाणी आहे…मिळालेल्या माहितीनुसार ही इमारत २०२१ यावर्षी बांधण्यात आली…नगरपरिषदेची इमारत बांधण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले…अवघ्या तीन वर्षात इमारतीमधून शौचालयचे पाणी टीप टीप गळायला सुरुवात झाली तर हे काम किती दर्जेदार झाले असावे?वर्षभरापासून शौचालयची तोंडी तक्रार असताना याची दुरुती का करण्यात आली नाही? ह्याची माहिती घेण्यासाठी पत्रकरांनी पाणी पुरवठा विभाग व बांधकाम विभागाला भेट दिली व शौचालयची माहिती विचारली असता पाणी पुरोठा विभाने माहिती देताना सांगितले की शौचालयचे वॉटरप्रूफिंगचे काम सुरु असल्यामुळे नळ पाणी बधं ठेवण्यात आले होते.तेसच बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता यांनी माहिती देतांना सांगितले की ह्या बिल्डिंगचे काम वेलविशेर बिल्डरने २०२१ साली पूर्ण केले होते त्याला या लिकेज असलेल्या पाणीविषय नोटीस देण्यात आली होती ह्या इम्रातीच्या डागडुगीचे काम त्यांनी करायचे आहे आदिक माहिती आमच्या वरिष्ट अभियंता आपल्यांना देतील आसे माहिती देताना सांगितले. मात्र गेल्या वर्ष भरापासून हे पाणी लिकेज असून शौचालयची बिकट अवस्था झाली असतांना हे काम त्वरित का करण्यात आले नाहीं? हे लोकसेवक ह्या सकाळी १० वाजे पासून ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत बसलेले असतात यांना हे दिसलेच नाही का?

स्वच्छ भारत या धर्तीवर राज्य शासनाने स्वच्छ महाराष्ट्रात ही संकल्पना गावागावात तेसच शहरी भागात ही राबविण्याची मोहीम हाती घेतली होती…पण खोपोली नगरपरिषद वंचीत राहिली की काय?असा प्रश्न आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष यासुद्दीन खान उपस्थित केला आहे. खोपोली शहराला गेल्या काही वर्षांपासून बेजबाबदार काम चुकार काम शून्य  लोकसेवक लाभल्याने खोपोली शहराचा अक्षरशा खेल खंडोबा झाला आहे.शहरातील लाखो रुपये खर्च करून शौचालय धुळखात पडलेले आहेत. रस्त्यांची अक्षय चालन झाली आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न  स्वच्छतेचा प्रश्न  जिथे पहावे तिथे  अतिक्रमणच अतिक्रमण  नियम मोडणाऱ्या बिल्डरांच्या बिल्डिंगचा धो धो वाहणारा सांडपाणी रस्त्यावर तर दिवस रात्र गटारातून वाहणारे सांडपाणी शुद्ध वाहणाऱ्या पातळगंगा नदीच्या पाण्यात,रात्रदिवस रस्त्यावर फेडणारे भटके कुत्रे तर घाणीच्या ढिगार्‍यांवर तोंड मारणारी मोकाट जनावरे?शहराची डोंगरभर समस्या असताना हातावर हात ठेऊन कार्यालयामध्ये एसीत बसणारे लोकसेवक? खोपोलीकरांना साधी शौचालयाची सुविधा देऊ शकत नाहीं का?या लोकसेवकांना मोठे पगार,वीआयपी सुविधा,एसी केबिन, अणि हाता खाली भ्रमसाठ स्टाफ पण काम नकोय?खोपोली नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टरची पदवीधर असून नागरिक,पत्रकारांना,भेट देण्यास फोन उचलण्यास तसेच समस्या जाणून घेण्यास कमीपणा वाटत असेल तर खोपोली शहराची डोंगरभर समस्या कशी मार्गी लावणार?अशी नाराजी व्यक्त करीत खोपोलीकरांनी प्रश्न उपस्थित केला आहे…