डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा ६८वा महापरिनिर्वाण दिन… महापरिनिर्वाण दिनानिमित्त बहुजन सेनेची अभिवादन जाहीर सभा…

0
56

महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):-  

ज्याला दुःखातून सुटका पाहिजे त्याला लढावे लागेल आणि ज्याला लढायचे असेल त्याला अगोदर शिकावे लागेल कारण ज्ञानाशिवाय लढलात तर पराभव निश्चित आहे..डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बहुजन सेनेची अभिवादन जाहीर सभा पार पडली…६ डिसेंबर १९५६ रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन झाले .या घटनेमुळे संपूर्ण देशावर दुःखाचा डोंगर कोसळला होता .संपूर्ण देशासह राज्यांमध्ये सहा डिसेंबर म्हणजेच महापरिनिर्वाण दिन म्हणून ओळखला जातो ..मुंबई येथील दादर चैत्यभूमी येथे लाखो भीम अनुयायी या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येत असतात.. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पाण्यासाठी सत्याग्रह केलेले चवदार तळे महाड येथे आहे. या ठिकाणी देखील लाखोंच्या संख्येने बहुजन समाज विनम्र अभिवादन करण्यासाठी येत असतो . महाड तालुक्यातील बहुजन सेना संस्थेकडून महापरिनिर्वाण दिनानिमित्त जाहीर अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. या अभिवादन सभेच्या सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा चवदार तळे तसेच क्रांती स्तंभास पुष्पहाराने अभिवादन करून त्रिसरण व पंचशीलने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.. या अभिवादन सभेला तालुक्यातून आलेल्या भीम ज्योत महाड बौद्धजन ग्रामस्थ मंडळ चोचींदे  व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज येथून भीम ज्योत यांचे स्वागत बहुजन सेना संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दीपेशभाऊ जाधव, बहुजन सेना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनिल नाना सपकाळ, बहुजन सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष एकनाथजी रोकडे यांनी केले..या अभिवादन सभेस येणाऱ्या भिमज्योत व सर्व भीम अनुयायांना माननीय दीपेश भाऊ जाधव यांच्याकडून अल्पोपहार व पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.. या अभिवादन सभेचा मुख्य उद्देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य व विचार तळागाळापर्यंत पोहोचवणे हाच आहे… या अभिवादन सभेस महाराष्ट्रातून तसेच इतर राज्यातून बहुजन सेनेच्या पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती. या अभिवादन सभेचे अध्यक्ष बहुजन सेना संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दीपेश भाऊ जाधव बहुजन सेना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनिल नाना सपकाळ ,बहुजन सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष एकनाथजी रोकडे साहेब,बहुजन सेना पश्चिम महाराष्ट्र सचिव अनंतजी पाटोळे, बहुजन सेना महाराष्ट्र प्रदेश सचिव रुपेशजी हाटे,बहुजन सेना सातारा जिल्हा अध्यक्ष दशरथजी कांबळे,  तसेच बहुजन सेना अध्यक्ष ईसाने कांबळे दीक्षा ताई कासारे,बहुजन सेना शाखा अध्यक्ष मोहोप्रे, सुरेंद्र जाधव, जितेंद्र जी खैरे कांबळे, आशिष तांबे, दीपक सकपाळ, प्रशांत जाधव नांदगाव बुद्रुक, प्रज्ञा साळवी, विशाल मोहिते, वासंती सावंत, दत्तात्रय जाधव, महाड तालुका अध्यक्ष दीपक जाधव, प्रभाकर साळवी सापे, प्रमोद तांबे विन्हेरे, संतोष खरात सातारा, अनिल शिंदे सातारा, नितीन जाधव , विशाल सपकाळ, शैलेश जाधव, मंगेश जाधव, रोहन जाधव , जयेश जाधव, शशिकांत जाधव,मयूर जाधव,उपाध्यक्ष महाड सौरभ हाटे असे महाराष्ट्रातील अनेक प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते…