ईव्हीएमविरोधात एकदिवसीय जनआक्रोश आंदोलन…राजाभाऊ ठाकूर यांना मिळतोय सर्व स्तरातून पाठिंबा…

0
50

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर) :-

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर तर्क वितर्क लढविले जात आहेत.या निकालावर विरोधकांचा विश्वास नाही.ईव्हीएम विरोधात आवाज उठविला जात आहे….त्यामुळे ईव्हीएम हटावचा नारा सारेच विरोधक देत आहेत…श्रीवर्धन मतदारसंघातून राजेंद्र मधुकर ठाकूर उर्फ राजाभाऊ ठाकूर यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यांना जी कमी मते मिळाली त्याची त्यांना अपेक्षा नव्हती…आपण ईव्हीएम बाधित असल्याचे त्यांचे म्हणणं आहे…त्यामुळे येत्या 9 डिसेंबर रोजी माणगाव येथे राजाभाऊ ठाकूर ईव्हीएम विरोधात जनआंदोलन करणार आहेत. या संदर्भात त्यांनी आज अलिबागमध्ये पत्रकारांना माहिती दिली…9 तारखेच्या आंदोलनात ईव्हीएम विरोध करताना भविष्यात येणाऱ्या निवडणुकीत धोके टाळण्यासाठी काळजी घेण्याबाबत विशिष्ठ प्रात्यक्षिक दाखवणार आहेत…त्यासाठी त्यांनी शासकीय जागेची मागणी केली आहे…या जनआंदोलनाला काँगेस,शेकाप आणि इतर राजकीय पक्षांचा पाठिंबा असल्याचे त्यांनी