रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर ) :-
विधानसभा निवडणुक २०२४ मध्ये रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार राजा भाऊ ठाकुर यांचा पराभव झाला होता…. मात्र हा पराभव ईव्हीएम मशीनची हेराफेरी करून तसेच छेडछाड झाल्याने माझा पराभव झाला असल्याचा आरोप राजा ठाकूर यांनी केला होता…
निवडणुकीतील ईव्हीएम यंत्रणा हटाव, जुन्या सुवर्ण पद्धतीत असलेल्या बॅलेट पेपर मध्येच पुढील सर्व निवडणुकी हाती घेण्यात यावी… हा विषय हाती घेऊन काँग्रेस पक्षाचे माजी दिवंगत आमदार मधुकर ठाकूर यांचे चिरंजीव तथा रायगड जिल्ह्यातील ज्येष्ठ काँग्रेस पक्षाचे नेते राजेंद्र मधुकर ठाकूर उर्फ राजा भाऊ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली तसेच सर्व विरोधी पक्षाच्या पुढाकाराने माणगाव येथे सोमवार दि.९ डिसेंबर रोजी संपूर्ण एक दिवसीय आंदोलन पार पडणार आहे…
याबाबत माणगाव प्रांत कार्यालयात गुरुवारी दि. ५ डिसेंबर रोजी राजा ठाकूर यांनी दुसरा अर्ज सादर केला होता.तर याआगोदर जिल्हाधिकारी अलिबाग येथे राजा भाऊ ठाकूर यांनी गेल्या महिन्यात २६ नोव्हेंबर रोजी सादर केला होता.सदर दोन्ही अर्जात संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीत ईव्हियम मशीनचे हेराफेरी करून तसेच छेडछाड झाल्याने माझा पराभव झाला आणि हीच कहाणी राज्यातील असंख्य उमेदवार मतदान यंत्र बाधित होऊन पराभूत झालेले आहेत… ही मतदान यंत्रणा EVM व VVPAT जोपर्यंत बंद होत नाहीत किंवा नवीन पर्याय प्राप्त होत नाही तोपर्यंत पारदर्शक पद्धतीने कोणत्याही निवडणुका पार पडणार नाहीत व नेहमीच लोकशाहीचा गळा घोटला जाईल असे राजा ठाकूर यांनी सांगितले आहे…
समाजाला अभिप्रेत असलेल्या नवीन पारदर्शक निवडणूक प्रक्रियेचे प्रात्यक्षिक दाखविण्याचे मानस आहे.तर यासाठी सुमारे ३० × ३० लांबी रुंदीची हॉल उपलब्ध करून दयावी व होणारे भाडे सरकारी तिजोरीत जमा करण्यास मी तयार आहे.असे ही सदर अर्जात नमूद केले आहे… तर निवेदन सादर करतेवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार गटाचे रायगडचे ज्येष्ठ नेते सदानंद येलवे, माणगाव ता. काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विलास सुर्वे, कार्यकर्ते फारुख परकार, रक्षित सामाजिक संघटनेचे अध्यक्ष शशिकांत पवार, तळा तालुक्यातील नामांकित ऍड. प्रितेश मेकडेसह आदि उपस्थित होते.
दरम्यानच्या काळात सदर आंदोलन माणगाव शहरातील मुंबई-गोवा महामार्ग रेल्वे स्टेशन जवळील एचपी पेट्रोल पंप जवळ असलेल्या मोकळ्या मैदानात येत्या सोमवारी दि.९ डिसेंबर रोजी होणार आहे… तर सदर ठिकाणी गुरुवारी दि.५ रोजी दुपारच्या वेळेत राजा भाऊ ठाकूर, विलास सुर्वे तसेच फारुख परकार यांनी मैदानाची पाहाणी केली… सदर आंदोलनास जिल्ह्याभरातून हजारो लोक शामील होणार असल्याचे राजा भाऊ ठाकूर यांनी सांगितले… हे आंदोलन सर्वपक्षीय विरोधीपक्ष घटकामधील आहे.
सदर आंदोलनास उपस्थित तसेच पाठिंबा मिळावे याकरिता राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा केंद्रीय माजी मंत्री शरदचंद्र पवार, माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, मनसे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेस पक्षाचे राज्य अध्यक्ष नाना पटोळे, वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, प्रहार शक्ती संघटनेचे ओमप्रकाश बच्चू कडू, वसई चे हितेंद्र ठाकूर, शेकापचे भाई जयंत पाटील, ईव्हीयम बाधित अनेक पराभूत उमेदवार, रायगड जिल्हा बार असोसिएशनचे वकील संघटना, अनेक NGO संघटना, डॉक्टर्स संघटना तसेच विविध नामांकित व्यक्तिमत्व यांना पत्र पाठविल्याचे खास निदर्शनास आणून दिले…