महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे) :-
बांगलादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्यांक मुद्द्यांवर नुकत्याच झालेल्या अत्याचाराचा तीव्र निषेध भारतीय जनता पार्टीने भटक्या विमुक्त जाती जमाती यांच्या वतीने करण्यात आला… हिंदूंची मंदिरे घरे आणि व्यवसायांवर पद्धतशीर हल्ला झाल्यामुळे जीवित हानी व दुखापत आणि विस्थापन झाले आहे… हे मानवी हक्क आणि मूलभूत स्वातंत्र्याचे उलंघन झाल्यामुळे बांगलादेश सरकारने सुरक्षितता करावी आणि गुन्हेगारांना त्यांच्या कृत्याबद्दल जबाबदार धरावे… बांगलादेश सरकारने हल्ल्याची सखोल चौकशी करून जबाबदार असलेल्यांवर खटला करावा… बांगलादेश सरकारने पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई द्यावी, अंतर धर्मीय संवादाला प्रोत्साहन द्यावे विविध समुदायांमध्ये समजदारपणा वाढवावा असे जाहीरपणे स्लोगन हिंदू समाज रायगड जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले आहे… त्यात इस्कॉनचे चिन्मय कृष्णा प्रभू यांची त्वरित मुक्तता करावी , संकटात बांगलादेशी हिंदू तर मदतीला कोटी कोटी हिंदू, हिंदू बांधवा जागा हो, धर्माचा धागा हो अशा विविध घोषणा हातात घेऊन हिंदू समाजातील सकल हिंदू समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते…