पोलीस प्रशासनाविरोधात अन्यायाला वाचा फोडण्यासाठी…रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने आमरण उपोषण…

0
64

पनवेल शिवसत्ता टाइम्स (दत्ता मोकल):- 

पनवेल तालुक्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत तसेच पोलीस प्रशासनाविरोधात अन्यायाला वाचा फोडण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने आमरण उपोषण शनिवार दि.७ नोव्हेंबर रोजी करण्यात आले…सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयाच्या नाकर्तेपणामुळेच पनवेल तालुक्यात अनुसूचित जाती अत्याचार प्रकरणांत वाढ होत आहे…अनुसूचित जाती अत्याचाराच्या विविध घटना पनवेलमध्ये घडल्या आहेत…त्यापैकी पोलिसांच्या कृपाशीर्वादाने एकाला जामीन देखील मिळाला आहे…पनवेल शहरात पोलिसांच्या आशिर्वादाने अनुसूचित जातींवर अत्याचार होत असल्याची जनतेत चर्चा आहे. त्यामुळे पोलिसांकडून अनुसूचित जातीच्या नागरिकांना न्याय मिळणे दुरापास्त झाले आहे.अशीच एक घटना २२ नोव्हेंबरला घडली आहे…शुभम कृष्णा पवार याने अनुसूचित जातीच्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार गैरफायदा घेतला आहे. त्यानंतर त्याने सदरच्या पीडित युवतीची फसवणूक केली आहे…याकामी शुभमचे आई वडील यांनी त्याला मदत केली आहे…सदर प्रकरणी या तीनही आरोपींविरुद्ध खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे…मात्र आरोपीना सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयाकडून अटक केलेली नाही. याबद्दल सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयात दि. ४ डिसेंबर रोजी पत्रव्यवहार देखील केला…मात्र तरीदेखील आरोपींना सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयाकडून ओरापींना अटक करण्यात आलेली नाही. याकामी शुभमचे आई वडीलांनी मदत केली आहे… सदर प्रकरणी या तीनही आरोपींविरुद्ध खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे…. मात्र आरोपींना सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयाकडून अद्याप अटक केलेली नाही… यामुळे जनतेचा पोलीस प्रशासना विरुद्धचा आक्रोश पाहता सुरेंद्र मधुकर सोरटे आणि दिनेश शांताराम जाधव अन्य जागृत नागरिक यांच्याकडून दि.7 डिसेंबर रोजी सकाळी 11:00 वाजता मान. प्रभाकर शाबा कांबळे (अध्यक्ष पनवेल महानगरपालिका जिल्हा क्षेत्र, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)) यांच्या नेतृत्वात मान. सहाय्यक पोलीस आयुक्त, पनवेल यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आले…