खालापूर पं.स.च्यावतीने दिव्यांग दिवस साजरा…दिव्यांगांनी शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा…

0
75

चौक शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम) :-

दिव्यांगांसाठी शासनाच्या अनेक योजना असून त्याचा लाभ घ्यावा, यासाठी संघटनांनी पुढाकार घ्यावा…  त्याला लागणारी मदत खालापूर पंचायत समितीच्यावतीने देण्यात येईल, असे आश्वासन खालापूर गटविकास अधिकारी संदीप कराड यांनी दिले… खालापूर पंचायत समितीच्या वतीने दिव्यांग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला… यावेळी खालापूर गटविकास अधिकारी संदिप कराड बोलत होते…
या कार्यक्रमाला खालापूर तालुक्यातील शंभरच्या वर दिव्यांग महीला व बांधव उपस्थित होते… दिव्यांग दिन ३ डिसेंबर रोजी असतो, पण प्रत्येक ग्रामपंचायत मध्य हा दिवस साजरा होत असल्याने दिव्यांग संघटनांनी आजचा दिवस नक्की केल्याने पंचायत समितीच्या सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता… खालापूर पंचायत समितीच्या वतीने सर्व दिव्यांगांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले… यावेळी दिव्यांगांसाठी शैक्षणिक, कृषी, आरोग्य, संजय गांधी निराधार योजना, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्यावतीने राज्य सरकार यांच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या योजना, दिव्यांगांना अर्धी घरपट्टी माफी, दिव्यांग दाखले याची परिपूर्ण माहिती देण्यात आली… तर दिव्यांगांनी आपल्या शंका विचारून निरसन करून घेतले… विस्तार अधिकारी शैलेंद्र तांडेल यांनी पंचायत समिती व जिल्हा परिषद, डॉ. शहा यांनी दिव्यांग दाखले, आरोग्य तपासणी, विस्तार अधिकारी खाडे यांनी कृषी, अनिल देशमुख यांनी शैक्षणिक, नायब तहसीलदार मिलिंद तिरहेकर यांनी संजय गांधी निराधार योजना व तहसील कार्यालय यांच्या योजना, दिव्यांग विद्यार्थी यांच्या योजनांची माहिती नंदकुमार घरत, डॉ.पाठक यांनी पशु वैद्यकीय यांची माहिती दिली… सर्व दिव्यांग यांचे स्वागत विस्तार अधिकारी शैलेंद्र तांडेल यांनी केले… कस्तुरी विचारे यांनी कागदपत्रे उपलब्ध करून दिली… यावेळी अपंग संघटनेचे अध्यक्ष दीपक पाटील, मंगेश पार्टे उपस्थित होते…