श्रीवर्धन शिवसत्ता टाइम्स (गणेश म्हाप्रळकर):-
सर्वत्र हिवाळी ऋतूत आणि विशेष करून डिसेंबर महिन्यात पर्यटक हा मोठ्या संख्येने फिरण्यासाठी बाहेर पडतात… शाळकरी मुलांच्या प्रासंगिक करार सहली देखील या महिन्यात पर्यटनासाठी मोठ्या संख्येने रायगड जिल्ह्यात येत असतात.सध्या किल्ले रायगड पाहण्यासाठी घाटमाथ्यावरील पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत यातच मराठवाडा,विदर्भ पश्चिम महाराष्ट्र भागांतील सहलींची मोठी गर्दी किल्ले रायगडावर झालेली पहायला मिळत आहे.