रसायनी शिवसत्ता टाइम्स (आनंद पवार) :-
मोहोपाडा पोसरी येथील ह.भ.प.संभाजी गोपीनाथ पाटील यांचे सोमवार दि.९डिसेंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले… मृत्यू समयी ते ७८ वर्षाचे होते….
संभाजी गोपीनाथ पाटील हे अत्यंत प्रेमळ मनमिळाऊ शांतप्रिय स्वभावाचे होते… काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असलेले संभाजी पाटील हे भारत सरकारच्या अंगीकृत असलेल्या एच.ओ.सी.कंपनीत नोकरीला होते… त्यांनी काही वर्ष कामगारांचे नेतृत्वही केले…. एच.ओ.सी.कंपनीतील पारस युनियनचे उपाध्यक्ष, इंटकचे चेअरमन तसेच रसायनी पाताळगंगा भूसंपादनचे उपाध्यक्ष अशा विविध क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला होता… संभाजी पाटील हे वारकरी संप्रदायात उत्कृष्ट मृदूंग वादक होते… हसतमुख मनमिळाऊ स्वभावाचे संभाजी पाटील यांच्या निधनाने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे…. संभाजी पाटील यांच्या पश्चात पत्नी, ३ विवाहित मुलं, सुना, १ विवाहित मुलगी, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे… त्यांच्या दुःखद निधनाचे वृत्त समजताच विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा तसेच वारकरी संप्रदायातील मंडळी त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते… संभाजी पाटील यांचे उत्तर कार्य शनिवार दि.२१ डिसेंबर रोजी नवीन पोसरी मोहोपाडा येथील त्यांच्या राहत्या घरी होणार असल्याचे कुटुंबियांकडून सांगण्यात आले….