पेण शिवसत्ता टाइम्स ( प्रदिप मोकल ) :-
ग्रुप ग्रामपंचायत काराव गडब, क्षितीज मल्टिपर्पज असोसिएशन पेण व तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेन्टर – नेरुळ, नवी मुंबई यांच्या संयुक्त विदयमाने १५ व्या वित्त आयोगातुन गडब येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते… या शिबीराप्रसंगी ग्रामपंचायतीच्या सरपंच मानसी पाटील, सदस्य दिनेश म्हात्रे, परशुराम मोकल, सदस्या संध्या म्हात्रे, वैशाली म्हात्रे, कीर्ती म्हात्रे आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते…
या शिबिरात तेरणा हाॅस्पीटलचे डाॅ.मनोज सकपाळ, डाॅ.अजित निळे, डाॅ.अजित जाधव, रंविद्र कदम, रजनिश शुक्ला, चंद्रकला भनगा, रोशनी कांबळे, नंदा राऊत, उमेश निकम, जनाब मोहम्मद, राहुल मोरे आदिंना रक्तदाब, मधुमेह, ई.सी.जी. तपासणी, फुफुसांची तपासणी आदि तपासण्या करुन, मोफत औषधे देण्यात आली…
या शिबिराचा गावातील बहुसंख्य नागरीकांनी लाभ घेतला… तर काही रुग्णांना अधिक उपचारासाठी तेरणा हाॅस्पीटल येथे येण्याचा सल्ला देण्यात आला….