रायगड शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन ) :-
मुरुड हद्दीतील निसर्ग हाॅटेल जवळच्या रस्त्यावरच्या वळणावर सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास मोटारसायकल चालक व एसटी बसची समोरासमोर ठोकर लागून अपघात झालाय…या अपघातात मोटारसायकल चालकाचा मृत्यू झाला…याबाबतची फिर्याद मुरुड पोलिस ठाण्यात निसार दखनी (वय 34 वर्षे, नांदगाव, मुरुड)यांनी दिली आहे…याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुरुड एसटी बस मुरुड आगारातून रेवदंडा मार्ग महाडकरिता सकाळी ८.०० वाजता बस क्रमांक एम एच-२० बीएल ०३२८ ही एसटी चालक अविनाश मोहन दिघे वय वर्ष ४१ व वाहक-प्रशांत बुधनार हे एसटी घेऊन निघाले असता पाच मिनिटांवर निसर्ग हाॅटेल समोरील अरुंद व वळणावरील रस्त्यावर मोटारसायकल चालक अरमान सलीम दखनी हा मुरुड अंजुमन इस्लाम डिग्री काॅलेजमधील एफ.वाय.बी.एस.सीमध्ये शिकणारा विद्यार्थी रा.मुरुड नादगांव मोहल्ला येथील रहिवासी आपल्या वडिलांची मोटारसायकल क्रमांक एम एच ०६ सी जे ००१७ बजाज कंपनीची केटीएम १२५ डक गाडी घेऊन निसर्ग हाॅटेलच्या रस्त्यावरून वळणावर येत असताना भरधाव एसटीची मोटारसायकल चालकाची समोरासमोर जोरदार धडक बसल्याने मोठा अपघात होऊन मोटारसायकल चालकाच्या डोक्याला मोठा मार लागल्याने रक्तस्राव होऊ लागला… तात्काळ मोटारसायकल चालकाला मुरुड ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले…परंतु वैद्यकीय अधिकारी डॉ.कदम यांनी मोटारसायकल चालक मृत झाल्याचे घोषित केले…
सदर माहिती मिळताच मुरुड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक व पोलीस कर्मचारी घटनास्थळी येऊन व ग्रामीण रुग्णालयात येऊन या अपघाताची चौकशी केली असता एसटी चालक अविनाश दिघे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे…याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार देशमुख करीत आहेत…