उरण शहरासह ग्रामीण भागात श्री दत्त जंयती सोहळा उत्साहात साजरा… 

0
112

उरण  शिवसत्ता टाइम्स (प्रविण पाटील) :-

दत्तजयंती ही हिंदु पंचांगात असलेल्या मार्गशीर्ष पौर्णिमा या तिथीला श्री दत्त जयंती साजरी केली जाते… हा दिवस भगवान दत्तात्रय यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो… शनिवार दिनांक १४ डिसेंबर २०२४ रोजी दत्त जयंती उत्सव उरण शहरासह ग्रामीण भागात आकर्षक रोशनाई, फुलांची सजावट करुन विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करून साजरी करण्यात आली…
उरण शहरातील देऊळवाडी येथे अनेक वर्षांपासून श्री दत्त जंयती मोठया उत्साहात, भक्तिभावाने साजरी केली जाते…  श्री दत्त गुरुचे दर्शन हजारो भाविक शिस्तबद्ध पद्धतीने घेतात… तसेच  ग्रामीण भागात चिरनेर, नवे पोपुड तसेच उरण पोलीस ठाण्यात, न्हावा पोलीस ठाण्यात आणि उरण वाहतूक पोलीस दत्त जयंती सोहळा करतात…
दत्त जयंतीनिमित्त सर्वत्र दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या गजरानी उरण येथील दत्त मंदिर परिसर दुमदुमून गेला होता….