परभणीत संविधानाच्या प्रतिमेची तोडफोड…अपमान करणाऱ्या देश विरोधी कृत्याचा जाहीर निषेध…

0
52

रसायनी शिवसत्ता टाइम्स (आनंद पवार):- 

परभणी येथे संविधान शिल्पातील विटंबना व घडलेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ शनिवार दि.१०डिसेंबर रोजी मोहोपाडा येथे रॅली काढून निषेध व्यक्त करण्यात आला…मोहोपाडा साई मंदिर येथील एच.ओ.सी. कॉलनीच्या गेटवर सर्व भीम अनुयायी एकत्रित जमून या निषेध रॅलीला सुरुवात झाली…डॉ.बाबासाहेब आंबेडकर,छत्रपती शिवाजी महाराज,अण्णाभाऊ साठे महात्मा फुले,या महापुरुषांचा जयघोष करत संविधानाचा विजय असो…अशा गगनभेदी घोषणा देत तमाम भीम अनुयायींनी या घटनेचा तीव्र संताप व्यक्त केला संविधानाची विटंबना करणाऱ्या माथेफिरूला कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी ही या रॅली मधून व्यक्त करण्यात आली…ही रॅली मुख्य रस्त्यावरून नवीन पोसरी कमानीतून मोहोपाडा मुख्य बाजारपेठेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला…तदनंतर मोहोपाडा येथील पोलीस चौकीसमोर प्रमुख कार्यकर्त्यांची घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ भाषणे झाल्यावर रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर व खालापूर तहसीलचे मंडल अधिकारी योगेश देशमुख यांना निवेदन देण्यात आले…सदर निषेध रॅलीमध्ये शिवसेनेचे रमेश पाटील, सुरेश म्हात्रे,अनिल पिंगळे,काँग्रेस पक्षाचे नाना म्हात्रे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे अरुण गायकवाड,शेतकरी कामगार पक्षाचे दशरथ गायकर,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आर.के.कांबळे, प्रकाश गायकवाड,विजय कांबळे,शांताराम सोनावळे,नारायण सोनावळे, आर.आर.कांबळे, सचिन कांबळे,आकाश कांबळे,आशिष जाधव,शैलेश सोनवणे,दीपक कांबळे,बाबासाहेब सोनवणे,अशोक लोखंडे किरण कांबळे,बामसेफचे जिल्हाध्यक्ष अरुण कुमार गोडघाटे,सुजित सोनवणे,ऑल इंडिया पॅंथर सेनेचे दयानंद सरवदे,भास्कर भवर,भारतीय बौद्ध महासभेच्या उषा कांबळे,कमल कांबळे, मनिषा कांबळे,पदमा जाधव,यांच्यासह भीम अनुयायी मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले होते…कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव,पोलीस उपनिरीक्षक महेश धोंडे, महिला पोलीस उपनिरीक्षक धार पवार मॅडम व पोलीस स्टाफ उपस्थित होता…