रसायनी परिसरात दत्त जयंती उत्सव उत्साहात संपन्न…दत्त जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन…

0
52

रसायनी शिवसत्ता टाइम्स (आनंद पवार) :-

सालाबादप्रमाणे याहीवर्षी दत्त जयंती उत्सव रसायनी परिसरात मोठ्या उत्साही व भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला…दत्त जयंतीचे औचित्य साधून रसायनी पोलीस ठाण्यात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सायंकाळी रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल रुपेश सपकाळ व सौ.अंजली सपकाळ यांना सत्यनारायण पूजेचा मान मिळाला. श्रीदत्त जन्मोत्सव,महाआरती, भजन तसेच महाप्रसादाचे आयोजनही रसायनी पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले होते.रसायनी-मोहोपाडा परिसरात दत्तगुरूंच्या मंदिरामध्ये तसेच रसायनी पोलीस स्टेशनच्या दत्त मंदिरात भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली…परिसरात दत्त जयंती उत्सव मोठ्या भक्तीमय वातावरणात व आनंदात संपन्न झाला.खालापूरचे पोलीस उपविभागीय अधिकारी विक्रम कदम यांची विशेष उपस्थिती लाभली होती शिवाय रसायनी पंचक्रोशीतील सर्व सामाजिक राजकीय,धार्मिक,शैक्षणिक,अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांसह पोलिसांच्या कुटुंबीयांनी हजेरी लावून दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला.रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव, पोलीस उपनिरीक्षक महेश धोंडे,प्रमोद हंबीर, सर्व पोलीस अंमलदार व पोलीस कर्मचाऱ्यांनी आलेल्या भक्तांचे स्वागत केले.