नांदगाव शिवसत्ता टाइम्स (अनिल धामणे):-
मनमाड शहर पोलीसांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे शहरातील श्रीराम चौकात असलेल्या महाराजा लॉजमधून घरफोडी मोटारसायकल चोरी याशिवाय इतर अनेक गुन्हे करणाऱ्या चार सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात यश आले असुन त्यांच्याकडून एक गावठी कट्टा पाच तोळे सोने तीन मोबाईल याशिवाय घरफोडी करण्यासाठी वापरण्यात येणारे हत्यार मिळून आले आहेत…यापैकी एकाला विश्वासात घेतले असता त्याने घरफोडी मोटारसायकल चोरी असे गुन्हे कबूल केले असुन चोरीचा माल मनमाडला विकण्यासाठी तसेच घरफोडी करण्यासाठी आलो असल्याचे कबुल केले आहे…
याबाबत पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की मनमाड शहर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले शिपाई रणजित चव्हाण यांना गोपनीय बातमीदारकडुन मिळालेल्या बातमीच्या आधारे मनमाड शहर पोलीस पथकाने श्रीराम चौक मनमाडजवळील महाराजा लॉजच्या पहील्या मजल्यावर रेड केली तेथे चार संशयित इसम मिळुन आले…पोलीस हे त्यांचे मागावर असल्याचा संशय झाल्याने त्यांचेपैकी एका इसमाने पोलीसांना जोराचा धक्का देवुन पळुन जाणेसाठी बाल्कनीतुन खाली उडी मारली. तो इसम खाली जमिनीवर पडल्याने त्याचे दोन्ही पायास मार लागुन दुखापत झाली त्याला व इतर तीन इसमांना सामानासह ताब्यात घेतले यात १) श्रावण पोपट भालेराव वय २४ वर्ष रा. जर्नाधननगर नांदुरनाका नाशिक २) रोशन बाळनाथ पगारे वय २४ वर्ष रा. अश्वीननगर मनमाड मुळ रा. दत्ताचे शिंगवे ता. चांदवड जि. नाशिक ३) अमन हिरालाल वर्मा वय ५० वर्ष रा. अंधेरी गुलमोहन कासरोड नं ७ समतानगर अंधेरी वेस्ट मुंबई ४, ४) सोमनाथ हरिचंद्र त्रिभुवन वय ३९ वर्ष रा. जाधव संकुल अंबड लिंक रोड नाशिक हल्ली रा. भिवंडी पाण्याचे टाकीच्या बाजुला असे असुन त्यांचे अंगझडती घेतली असता एक गावठी बनावटीचा कटटा व तीन जिवंत काडकुस, अंदाजे ५ तोळ्याचे सोन्याचे दागिने, तीन मोबाईल, रोख रक्कम, तीन कात्रीचे भाग घासुन तयारे केलेले चोरी व घरफोडीचे हत्यार, एक छोटे कटर, असा मुददेमाल मिळून आला.यातील आरोपी श्रवण पोपट भालेराव यास विश्वासात घेवुन विचारपुस केली असता मोटारसायकल, मोबाईल चोरी व घरफोडी करणारा असुन त्याने व अमन हिरालाल वर्मा याने भिवंडी येथील धामणकर नाका ते कल्याण नाका या दरम्यान घरफोडी करुन चोरुन आणलेले सोने विकण्यासाठी व घरफोडी चोरी करण्यासाठी मनमाड शहरात आलो होतो असे कबूल केले वरील आरोपीवर मनमाड शहर पोलीस स्टेशन गुरनं ७३४/२०२४ भारतीय व्याय संहिता २०२३ कलम १३२, ३(५) सह भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ दिनांक २१/१२/२०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपी सध्या पोलीस कस्टडी रिमांड मध्ये आहे. गुन्हयाचा पुढील तपास सपोनि हेमंत भंगाळे मनमाड पोलीस स्टेशन हे करीत आहे. सदरची कारवाई विक्रम देशमाने, पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण, अनिकेत भारती, अपर पोलीस अधीक्षक, मालेगाव विभाग, मा. बाजीराव महाजन, उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली विजय करे, पोलीस निरीक्षक, सपोनि हेमंत भंगाळे, मनमाड पोलीस स्टेशन व पो. हवा. प्रल्हाद सानप, पोशि रणजित चव्हाण पोशि संदिप झाल्टे, पोशी राजेंद्र खैरनार पोलीस अंमलदार मनमाड शहर पोलीस स्टेशन यांनी केलेली आहे.