नेरळ शिवसत्ता टाइम्स(संदेश साळुंके):-
परभणी हत्याकांड,बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या, भारताचे संविधान त्याचे अवमान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणारे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत केलेल्या वक्तव्याचे निषेध म्हणून नेरळ बंदला कालपासूनच प्रचार करण्यात आला व आज शंभर टक्के बंद पुकारण्यात आले असून सदरील बंद हे दुपारी तीनवाजेपर्यंत असणार आहे असे सांगण्यात आले आहे… नेरळ पूर्व,नेरळ पश्चिम येथे सर्व छोट्या मोठ्या व्यापारी तसेच भाजीविक्रेता फूटपातवरील विक्रेता याने शंभर टक्के बंद पुकारला आहे… नेरळ भीम आर्मी समाज पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पार्टी,शिवसेना उद्धव ठाकरे गट या सर्व पार्टी या सर्व पक्ष लोकांनी नेरळ बंद ठेवण्याची हाफ दिली होती. त्या अनुषंगाने शंभर टक्के बंद केला आहे.कोणताही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून ठीक ठिकाणी पोलीस बंदोबस्त ही ठेवण्यात आला आहे…