डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्याविषयी बेताल वक्तव्य… गृहमंत्री अमित शहांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा…

0
52

रसायनी शिवसत्ता टाइम्स (आनंद पवार):-  

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचा जाहीर निषेध व्यक्त करून तसेच परभणी येथे घडलेल्या हिंसाचारात अॅड सोमनाथ सुर्यवंशी यांचा संशयास्पद मृत्यूच्या निषेधार्थ रसायनी-मोहोपाडा परिसरात तमाम आंबेडकरी समाजाकडून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला असून या घटनेची सखोल चौकशी व्हावी व आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी आंबेडकर समाजामधून व्यक्त करण्यात आली…

भारतीय जनता पक्ष व त्यांचे असलेली मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी तिरस्काराची भूमिका आज मिति पर्यंत पाहायला मिळाली आहे.बहुजन समाजातील महापुरुषां बद्दल अपमानास्पद व बेताल वक्तव्य करणे ही भाजप व आरएसएसची विकृती असल्याचा हल्लाबोल व संतप्त प्रतिक्रिया आंबेडकर समाजामधून व्यक्त झाली… देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी संविधानाचे निर्माते विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा घोर अपमान करत त्यांच्याविषयी बेताल वक्तव्य केले अशा अमित शहांना मंत्रिमंडळातून त्वरित हकालपट्टी करावी अशी मागणी आंबेडकरी समाजामधून व्यक्त होत आहे.शिवाय परभणी येथील घटनेत घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान प्रतिकृतीची ज्या माथेफिरू ने तोडफोड करत परभणीत जो हिंसाचार उद्धभवला त्यात अॅड सोमनाथ सूर्यवंशी या तरुण भीमसैनिकांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्याने संपूर्ण देशभरात आंबेडकरी जनता व संविधान प्रेमींमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून रविवार दि.२२ डिसेंबर रोजी मोहोपाडा येथे या घटनेच्या निषेधार्थ तमाम आंबेडकर अनुयायींनी निषेध व्यक्त करत तीव्र संताप व्यक्त केला… मोहोपाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ सर्व आंबेडकरी समाजबांधव एकत्रित होऊन अमित शहाच्या विरोधात घोषणाबाजी केली…अमित शहा होश मे आओ.. होश में तुमको आना ही होगा… संविधान के राज मे दानाशाही नही चलेगी… सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे.. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना न्याय मिळालाच पाहिजे… सविधान जिंदाबाद. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो..छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो… अशा गगनभेदी घोषणा देत तमाम आंबेडकर अनुयायांनी संताप व्यक्त करत घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त केला.यावेळी मोठ्या संख्येने भीम अनुयायी महिला भगिनी या निषेध मोर्चामध्ये सहभागी झाले होते. कुठे अनुचित प्रकार घडू नये म्हणून रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद हंबीर व त्यांचा पोलीस स्टाफ मोठ्या प्रमाणात उपस्थित होता…