माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-
डिसेंबर महिना म्हटला की नाताळ आणि नववर्षाची चाहूल सुरू होते. ख्रिश्चन बांधवांमध्ये नाताळ सणाची लगबग सुरु झाली असून नववर्षाच्या स्वागताच्या जय्यत तयारीत ख्रिस्ती बांधव गुंतले आहेत.नाताळच्या पार्श्वभूमीवर माणगाव शहरात ख्रिसमस कॉरोल सिंगिंग सध्या सुरू असून ख्रिस्ती बांधव एकत्रित येऊन एकजुटीचा संदेश देत घरोघरी जाऊन देत आहेत…त्यामुळे एकप्रकारे नाताळ सणाचा माहोल तयार झाला आहे.माणगावात ख्रिसमस साजरा केला जातो…येत्या 25 डिसेंबरला नाताळ उत्सव साजरा केला जाणार आहे… त्यामुळे नाताळ सणाची लगबग आणि जय्यत तयारी पाहायला मिळत आहे…येत्या दोन चार दिवसांवर नाताळ सण आणि नववर्षाचे स्वागत जल्लोषात केले जाणार आहे…संपूर्ण बाजारपेठ नाताळ सणाच्या चाहुलीने सजून गेली आहे…. माणगाव शहर, मडेगांव, जांभूळवाडी, इंदापूर, तळा तसेच म्हसळा या सर्व भागातील ख्रिस्ती बांधव सध्या या माहोलमध्ये रंगून गेले आहेत.नाताळमध्ये सांताक्लॉज सर्वांचे आकर्षण ठरत असतो. गावागावात वाड्या वाड्यात जाऊन सांताक्लॉज लहान मुलांना चॉकलेट खाऊ देऊन एक मनोरंजनात्मक असा संदेश या निमित्ताने देत असतो. सध्या सर्वत्र नाताळमय वातावरण तयार झाले आहे.‘जिंगल बेल…जिंगल बेल..जिंगल ऑल द वे..’ ची धून गात शहरातील ख्रिश्चन बांधवांनी ख्रिसमस सणास सुरुवात केली आहे…दरम्यान सदर के्रॉल सिंगिंगच्या वेळी परिसरातील ख्रिस्ती बांधवांसोबत सर्व विकास दीप संस्थेतील (माणगाव) फादर थॉमस शिकवेरा, फादर मॅथयू कोरत्तीईल,तळा येतील जनसेवा संस्थेतील फादर निक्सन आणी फादर लूकास यांनी आपली उपस्थिती दर्शवून प्रार्थना करून के्रॉल सिंगिंग धार्मिक उपक्रमास चालना दिली.