रसायनी शिवसत्ता टाइम्स (आनंद पवार):-
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त चांभालीऀ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मोफत नेत्र तपासणी शिबिर नुकतेच संपन्न झाले.प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. सुहास हळदीपुरकर यांचे लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चांभालीऀ येथे मोफत डोळे तपासणी शिबिराचे उद्घाटन चांभालीऀ ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच प्रतीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच समीर पाटील,माजी उपसरपंच दत्तात्रेय जांभळे,चित्रा महेंद्र मुंढे,सदस्य स्वप्निल जांभळे,मोहन मुंढे,सामाजिक कार्यकर्ते मिलिंद मुंढे,महेंद्र मुंढे विलास शिंदे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.सदर शिबिरामध्ये मोठ्या संख्येने शिबिरार्थ्यांनी सहभाग नोंदवला डोळे तपासणी शिबिरात चार रुग्ण मोतीबिंदूचे आढळून आल्याने या रुग्णांवर पनवेल येथील लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली सदर नेत्र तपासणी शिबिरात मोफत नेत्र तपासणी व अल्पदरात चष्मे वाटप करण्यात आले.सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला रायगड जिल्हा अध्यक्षा सौ.दीपिका दीपक भंडारकर तसेच डॉ. सिमरन आहूजा,पायल पाटील,भूषण रंगारी, शिबिराचे समन्वयक विनोद पाचघरे,कुलदीप उन्हाळकर योगेश जगताप यांचे विशेष सहकार्य लाभले.