चौक शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम):-
जैन साध्वीबरोबर पायी चालणाऱ्या सेवेकरी युवकाला रिक्षाने जोरदार धडक दिल्याची घटना सकाळी चौक गावाजवळील रामानंद सागर फार्महाऊस येथे घडली…ही धडक एवढी भीषण होती की, मित विनोद जैन वय वर्ष १८ याचा जागीच मृत्यू झाला…या दुर्घटनेत जैन साध्वी बचावली असून तिला कोणतीही दुखापत झाली नाही… जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून जैन साध्वी पनवेल दिशेने सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास जात होत्या.त्यांच्यासोबत विनोद जैन हा सेवेकरीदेखील चालत होता. त्याचवेळी मागून भरधाव वेगात रिक्षा आली आणि त्याला जोरात ठोकर दिली. त्यात विनोद जैन हा रक्तबंबाळ होऊन रस्त्यावर कोसळला. त्याला चौक ग्रामीण रुग्णालयात दाखल केले…मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. आसरेवाडीजवळ हा अपघात झाला असून पोलीस अधिक चौकशी करीत आहेत. मात्र पुन्हा एकदा प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे…