रसायनी शिवसत्ता टाइम्स (आनंद पवार) :-
रसायनी मोहोपाडा येथील अष्टविनायक हॉस्पिटल येथे मोफत मेगा आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन शनिवार दिनांक २१ डिसेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले होते…
या शिबीरात रँडम ब्लड शुगर (रक्तातील शर्करा) सी. बी.सी.(संपूर्ण रक्तातील घटक)रक्तदाब, ईसीजी,एक्स रे,ऑडिओमेट्री (श्रवण क्षमता तपासणी, बीएमआय,डोळ्यांची तपासणी (मोतीबिंदू आणि चष्म्याचा नंबर) आणि स्पेशालिस्ट तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व सल्ला यावेळी रुग्णांना देण्यात आला…
या शिबिरात मोहोपाडा आणि आजूबाजूच्या परिसरातून जवळपास २०९ नागरिकांनी आपल्या तपासण्या करून घेतल्या…
या शिबिरासाठी अष्टविनायकच्या टीमने विशेष मेहनत घेऊन शेवटच्या रुग्णापर्यंत मोफत तपासण्या करण्यात आल्या… आयोजित करण्यात आलेल्या शिबिराच्या निमित्ताने अष्टविनायक हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या स्पेशालिटीचे शिबीरे घेण्याचा मानस हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉ.अगरवाल यांनी यावेळी व्यक्त केला… तसेच हॉस्पिटलचे मुख्य विपणन अधिकारी रुपेश यादव यांनी या शिबीरात सहभागी झालेल्या मोहोपाडा व आसपासच्या सर्व संस्था, संघटना आणि नागरिकांचे आभार व्यक्त केले व अशीच सेवा अष्टविनायक हॉस्पिटलच्या माध्यमातून वेळोवेळी देत राहू असेही यादव यांनी म्हटले… असेच शिबीर अथवा भविष्यात आरोग्यसेवा मार्गदर्शन लागणार असल्यास 9833104487 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही अष्टविनायक हॉस्पिटलच्या माध्यमातून करण्यात आले…