मनमाड गुरुद्वारात सालाना जोडमेला मोठ्या उत्साहात संपन्न…! चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर…

0
49

मनमाड शिवसत्ता टाइम्स (अनिल धामणे) :- 

शीख धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या मनमाड शहरातील गुरुद्वारामध्ये आज गुरु-दा-गद्दी सोहळा आणि सालाना जोडमेला पारंपारिक पद्धतीने मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला…
सालाना जोडमेला निमित्त गुरुद्वारात  अखंड पाठ समाप्ती, भजन, कीर्तन, लंगर आदीसह इतर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते… दुपारनंतर शहरातून भव्य शोभा यात्रा (नगर कीर्तन) काढण्यात आली होती… ढोल-ताशा, पंजाबी बँड, पारंपरिक हलगी, डीजे यासह इतर वाद्य या मिरवणूकित सहभागी झाले होते… तसेच तलवारबाजी यासह इतर पारंपरिक शस्त्रचे चित्त थरारक प्रात्यक्षिके दाखविण्यात आली… या सोहळ्यासाठी पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, मुंबई, मध्य प्रदेशसह देशभरातून मोठ्या संख्येने भाविक आले होते….
देशातील अमृतसर आणि नांदेडनंतर मनमाडचा गुरुद्वारा मानला जातो… येथे दरवर्षी डिसेंबर महिन्यात गुरु-दागद्दी सोहळा आणि सालाना जोड़ मेला साजरा करण्याची गेल्या अनेक वर्षाची परंपरा आहे… दरवर्षी प्रमाणे यंदाही हा सोहळा मोठया जल्लोषात साजरा करण्यात आला… यानिमित्त गुरुद्वारा प्रबंधक बाबा रणजितसिंग कारसेवावाले यांच्या नेतृत्वाखाली भव्य शोभा यात्रा (नगर कीर्तन) काढण्यात आली होती… यावेळी शीख बांधवानी तलवारबाजीसह इतर चित्तथरारक प्रात्याक्षिके दाखविली… ते पाहून सर्वजण मंत्रमुग्ध झाले होते… गुरुद्वारा येथून काढण्यात आलेल्या शोभा यात्रेचे ठिक ठिकाणी स्वागत करून धर्मगुरूंचा सत्कार करण्यात आला… अमृतसर नांदेड त्यानंतर मनमाडचा गुरुद्वाराचा नंबर लागतो… भारतातील प्रमुख गुरुद्वारापैकी हाही एक आहे येथील धार्मिक कार्यक्रमात संपूर्ण भारतातून शीख बांधव येतात… वर्षाचा सालाना जोडमेला निमित्त देखील शिख बांधव जमले होते… मोठ्या थाटामाटात आजचा हा सालाना जोडमेला संपन्न झाला… यावेळी सर्वधर्मीय उपस्थित होते… सालाना जोडमेला महिनाभरापासूनच भजन कीर्तन अखंड पाठ सुरू होते…आज पहाटे त्याची समाप्ती करण्यात आली… गुरुद्वारामध्ये श्री गुरुगोविंद सिंग यांचे भव्यदिव्य पोस्टर लावण्यात आले… यावेळी लंगर देखील वाटप करण्यात आला… एकात्मता चौकात वंदे मातरम गणेश मंडळाचे संस्थापक संजय कटारिया व त्यांच्या कार्यकर्त्यांनी या भव्य रॅलीचे स्वागत केले… यावेळी बाबा रणजित सिंह यांचा व त्यांच्यासोबत आलेल्या मान्यवरांचा कटारिया यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला… यावेळी मुस्लिम समाजाच्यावतीने बाबा रणजित सिंह यांचा सत्कार करण्यात आला…