बौद्ध समाजाचा प्रांत कार्यालयावर विराट मोर्चा…बाबासाहेब आंबेडकरांच्या विधानावरुन वादंग…

0
37

महाड शिवसत्ता टाइम्स (रेश्मा माने):- 

परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील भारतीय राज्यघटनेच्या प्रतिकृतीची विटंबना केल्याबद्दल व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेच्या अधिवेशनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमान असतं फक्त ते केल्यासंदर्भात महाड तालुक्यातील बौद्ध समाजाचा प्रांत कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला…
याबाबत सविस्तर घटना अशी की,दहा डिसेंबर २०२४ रोजी परभणी येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील भारतीय राज्यघटनेच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली व सोमनाथ सूर्यवंशी याला पोलीस कस्टडी मारहाण करण्यात आली तसेच 18 डिसेंबर 2024 रोजी संसदेच्या अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अपमानास्पद शब्द वापरल्याने संपूर्ण महाराष्ट्रातील आंबेडकरी जनता यांच्या भावना दुखावल्या असून यासंदर्भात महाड तालुक्यातील बौद्ध समाजाच्या सर्व राजकीय सामाजिक धार्मिक संघटनांच्या वतीने मंगळवार दिनांक 24 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता श्री विनायक हाटे यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते मोर्चेची सुरुवात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली…हा मोर्चा महाड तांबट आळी येथून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून घोषणाबाजी देत बाजारपेठेतून करण्यात आला या मोर्चात विश्वनाथ सोनवणे,अशोक जाधव, लक्ष्मण जाधव, मुकुंद पाटणे, अरुण कासारे, अरुणा आजगावकर, मोहन खांबे ,मोहन धोत्रे, स्वरूप खांबे ,दीपेश भाऊ जाधव ,आनंदराज घाडगे ,राजेंद्र पाटणे ,राहुल साळवी, दलित मित्र केशव वाटे, भीमराव तांबे, बौद्ध समाजाचे सर्व महिलावर्ग व पदाधिकारी यांनी सहभाग घेतला महाड प्रांत कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर प्रांत अधिकारी यांना निवेदन देण्यात आले… हॉटेल अलंकार येथे आरोपीना कठोर शिक्षा करण्यासंदर्भात निषेधार्थ सांगता सभा घेण्यात आली…