श्रीवर्धनात सकल हिंदू समाजातर्फे न्याय यात्रा…यात्रेला हिंदू समाजाच्या नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

0
43

श्रीवर्धन शिवसत्ता टाइम्स (आनंद जोशी):- 

गेले काही महिने बांगलादेशात हिंदु समाजाच्या नागरिकांना मारहाण करणे,त्यांच्यावर अत्याचार करणे इ.प्रकार होत आहेत.त्याच्या निषेधार्थ आपल्या देशात ठिकठिकाणी निषेध यात्रा निघत आहेत.श्रीवर्धनमध्येही रविवार दि.  22 डिसेंबर रोजी सकल हिंदू समाज, श्रीवर्धनतर्फे बांगलादेश हिंदू न्याय यात्रा काढण्यात आली होती…या यात्रेला उत्स्फूर्त व दणदणीत प्रतिसाद मिळाला…यात्रेमधील नागरिक जय श्रीराम,भाग जा भाग जा ,बांगलादेशी भाग जा अशा घोषणा देत होते.श्रीवर्धन एस.टी.स्थानकापासून यात्रेला सुरुवात झाली.ही यात्रा तेथून उपविभागीय अधिकारी,श्रीवर्धन यांच्या कार्यालयापर्यंत जाऊन तेथे उपविभागीय अधिकारी,श्रीवर्धन यांच्यावतीने नायब तहसिलदार श्री.मनोज माने यांनी निवेदन स्वीकारले.निवेदन देण्यापूर्वी उपस्थितांसाठी श्री.मार्तंड महाराज,मृदास तोंडलेकर,अॅड.अनिकेत ठाकूर यांनी आपले विचार  मांडले.हिंदू समाजावर बांगलादेशात होणाऱ्या मारहाणीविरुद्ध, अन्यायाविरुद्ध सर्वांनी एकत्र आले पाहिजे असे आवाहन केले.पूर्वी भारताचा भाग असलेल्या बांगलादेशात फक्त नऊ टक्के हिंदू आहेत.मात्र त्या ठिकाणच्या जिहादी प्रवृत्तीकडून हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले जात आहेत.यासाठी भारत सरकारने त्या ठिकाणी लक्ष देऊन हिंदुंवरील अत्याचार थांबविण्यासाठी तातडीने प्रयत्न करावेत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.तसेच शासनाने बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करुन त्यांना देशाबाहेर पिटाळून लावावे अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे…या यात्रेचे वेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता..