नेरळ परिसरात राजरोसपणे मातीचे उत्खनन… अर्धा डोंगर खोदला तरी शासन अनभिज्ञ…  

0
44

 नेरळ शिवसत्ता टाइम्स (संदेश साळुंके):-

नेरळ परिसरातील तीवाळे हॉटेलच्या बाजूला दिवसाढवळ्या डोंगर पोखरायला सुरवात केली आहे…मात्र डोंगर पोखरताना कोणाचीही परवानगी घेतली नसल्याचे बोलले जात आहे. तलाठी व शासकीय अधिकारी यांना तर याचा पत्ताच नाही…परंतु अर्धा डोंगर उपसून देखील मातीचे उत्खनन करत सरकारी कर न भरता ठेकेदार स्वतःचे खिसे भरत आहे…