मंत्री नसलो तरी मंत्र्यापेक्षा जास्त काम करतो… पाचवर्षात मतदारसंघातील सर्व विकासकामे पूर्ण करेन… 

0
54

 पेण शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

राजकीय व सामाजिक दृष्ट्या सुधागडच्या जनतेने मला भरभरून प्रेम दिले आहे… त्याचे ऋण म्हणून सुधागडच्या सर्वांगीण व शाश्वत विकासासाठी कटिबद्ध राहणार आहे… कॅबिनेट मंत्री असताना संधीचे सोने केले… मी स्वाभिमानी आहे,मंत्री नसलो तरी मंत्र्यापेक्षा जास्त काम करतो, पाच वर्षात सर्व विकासकामे पूर्ण करेन, कारण मी यापुढे कोणतीही निवडणूक लढविणार नाही असे पेण सुधागड रोहा मतदारसंघाचे आमदार रविशेठ पाटील यांनी नुकतेच जाहीर केले… पालीतील प्रकाश देसाई सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे प्रकाशभाऊ देसाई , सिने अभिनेते प्रशांत दामले यांच्या हस्ते व अन्य मान्यवरांच्या उपस्थित  आयोजित नागरी सत्कार सोहळ्यात रविशेठ पाटील यांनी जाहीर केले. आमदार रविशेठ पाटील पुढे म्हणाले की  प्रकाशभाऊ देसाई यांच्या पुढाकाराने  नाट्यचळवळ  टिकविण्याचे  मोठे काम केले आहे.

ग्रामीण भागात राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा व त्याला मिळणारा उदंड प्रतिसाद पाहून माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच मन भरून आले… कारण ग्रामीण भागात  आता नाट्यप्रयोग, एकांकिका चे प्रमाण कमी झाले आहे… शहरी भागात ही नाट्यगृहे बंद पडत चालली आहे. अशात प्रकाशभाऊ यांना धन्यवाद  देईन, की प्रकाशभाऊ देसाई व त्यांच्या सहकाऱ्यांनी अपार कष्ट व दुर्मिळ तपश्चर्या केली. ज्यामुळे सुधागड सारख्या दुर्मिळ गावांना राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धांचा  आस्वाद घेता आला… चित्रपटापेक्षा नाट्यसंस्कृती महत्वाची असून ती जपली पाहिजे… आज समाजात नाट्यसंस्कृती जपली जात नाही… याची खंत वाटते… ग्रामीण भागातील तरुण त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव मिळून होतकरू कलाकार पुढे आले पाहिजे यातच खरा मोठेपणा आहे… सुधागडने मला राजकीय दृष्ट्या भरभरून प्रेम दिले आहे… मला जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हापासून आदिवासी बांधवांचा जास्तीत जास्त विकास साधण्यावर भर दिला… सुधागडचे रस्ते व दळणवळणाच्या सोई सुविधा देण्यावर भर दिला… येत्या पाच वर्षात  कुठलेही  गावांना जोडणारे रस्ते अपूर्ण राहणार नाही. पाच वर्षात जास्तीत जास्त चांगली कामे करणार आहे… मी मंत्री नसलो तरी मंत्र्यापेक्षा अधिक काम करतो… पाली शहराला शुद्ध पाणीपुरवठा योजना  लवकरच कार्यान्वित केली जाईल… पाली चा बायपास चा प्रश्न सोडवून वाहतुक कोंडीची समस्या कायमची  दूर करू पाच वर्षात मी जास्तीत जास्त व प्रलंबित राहिलेली सर्व  विकासकामे करणार आहे. कारण  यापुढे मी कोणतीही निवडणूक लढविणार नाही. असे रविशेठ पाटील यांनी सत्कार सोहळ्यात जाहीर केले…

प्रतिष्ठानचे सर्व्हेसर्वां प्रकाशभाऊ देसाई म्हणाले की पेण सुधागड रोहा मतदारसंघाचे आमदार रविशेठ पाटील यांचा आज भव्य नागरी सत्कार करण्यात आला. सुधागडच्या विकासात्मक जडणघडणीत त्यांचे महत्वपूर्ण योगदान लाभले आहे… सुधागड मध्ये दुर्गम, डोंगराळ माळरान पठार या ठिकाणी  रस्त्यांचे त्यांनी यशस्वी रित्या जाळे विणले… गावोगावी रस्ते पोहचवले त्याचे फलित म्हणून त्यांना जनतेने विकासासाठी पुन्हा विधानसभेत पाठवले… आदिवासी बांधवांना त्यांनी खावटी वाटप केले… सुधागडच्या विकासासाठी त्यांनी नेहमीच झुकते माप दिले  व यापुढेही देत राहतील असा विश्वास आहे असे देसाई म्हणाले… राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत माझ्या सुधागड तालुक्यातून एका एकांकिकाने अत्यंत प्रगल्भतेने, नाविन्यपूर्ण  सुंदर सादरीकरण व दिग्दर्शन केले… 12 वर्षाचे फलित काय असते , हे एकांकिकेच्या माध्यमातून सिद्ध झाले… प्रतिष्ठान ने केवळ रसिक प्रेक्षक नव्हे तर होतकरू कलाकार निर्माणाचे काम देखील या प्रतिष्ठानने केले याचा सार्थ अभिमान व समाधान वाटत असल्याचे देसाई म्हणाले…