इनोव्हा कारची दुचाकीला मागून जोरदार धडक…कारच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार …

0
70

रोहा शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर)  :-

मुंबई-गोवा महामार्गावर अपघाताची मालिका सुरुच असताना शनिवार दि.२८ डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास इंदापूरनजीक वावे दिवाळी येथे भारत सरकारची गाडी इनोव्हा व दुचाकी यांच्यामध्ये भीषण अपघात झाला…या अपघातामध्ये इनोव्हा कारने दुचाकीस्वाराला मागून धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला…
याबाबत सविस्तर घटना अशी की,रोहा तालुक्यातील महादेव वाडी येथील राजाराम अनंत धारदेवकर वय वर्षे ( ६४ ) एम.एच.०६ बी.एक्स १८८३  हे रोहा येथून माणगावच्या दिशेने जात होते… तर भारत सरकार इनोव्हा एम.एच. ०६ सी. एस. ३४९९ ही गाडी मुंबईच्या दिशेने माणगावकडे जात असताना इंदापूरनजीक वावेदिवाळी येथे इनोव्हा कारने मागून   दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिली… त्यामुळे राजारम धारादिवकर यांचा जागीच मृत्यू झाला… या मृत व्यक्तीला माणगाव शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे… घटनेचा पुढील तपास माणगाव पोलीस स्टेशनचे निरीक्षक करीत आहेत…